जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात कोयत्याने मारहाण करून ४२ हजार ५०० रुपयांची चोरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जुन्या गोदावरी डाव्या कालव्याच्या लगत असलेल्या वस्तीवर फिर्यादीचाच चुलतभाऊ असलेल्या आरोपी राहुल कैलास कदम व प्रदीप कैलास कदम दोघेही रा.पढेगाव यांनी लाल रंगाचे दुचाकीवरून येऊन आपल्या घरी सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घरी येऊन आपल्या आईस शिवीगाळ दमदाटी करून दरवाजा उघडण्यास भाग पाडून आपल्या घरात अनाधिकाराने घुसले व कोयता, लाकडी दांडक्याचा वापर करून जबर मारहाण केली व आपल्यास जखमी करून पत्नीचे गळ्यातील ४२ हजार ५०० रुपये किमतीचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले आहे.शिवाय, “पोलिसात फिर्याद दिली तर तुझा कोथळा बाहेर काढील” अशी धमकी दिली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नवनाथ भाऊसाहेब कदम (वय-४०) याने दिली आहे.

आरोपी राहुल कैलास कदम व प्रदीप कैलास कदम दोघेही रा.पढेगाव यांनी लाल रंगाचे दुचाकीवरून येऊन आपल्या घरी सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घरी येऊन आपल्या आईस शिवीगाळ दमदाटी करून दरवाजा उघडण्यास भाग पाडून आपल्या घरात अनाधिकाराने घुसले व कोयता, लाकडी दांडक्याचा वापर करून जबर मारहाण केली व आपल्यास जखमी करून पत्नीचे गळ्यातील ४२ हजार ५०० रुपये किमतीचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले आहे.शिवाय, “पोलिसात फिर्याद दिली तर तुझा कोथळा बाहेर काढील” अशी धमकी दिली आहे.

या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.या घटनेत आरोपीने फिर्यादीचे घरातील ४२ हजार ५०० रुपये किमतीचे मनी मंगळ सूत्र,डोरले, कानातील रिंगा आदी दागिने पळवून नेले आहे.घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक अनिल कटके सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे आदींनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी राहुल कदम व प्रदीप कदम यांच्या विरुद्ध गु.र.न.९३/२०२०भा.द.वि.कलम ३२९,४५२,३४ आर्म ऍक्ट ४/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close