जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तोंडास मास्क नाही,कोपरगावात गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात व देशात कोरोना विषाणूंचा कहर माजलेला असतानाही काही नागरिकांमध्ये या धोकादायक विषाणू बद्दल अद्याप जागृती आलेली दिसत नसून पोलिसही या बेजबाबदार नागरिकांना वैतागलेले दिसत आहे. कोपरगावात अनिल वसंतराव आमले (वय-५८) रा.सुभद्रानगर या एका नागरीका विरुद्ध मास्क न लावताच आपली दुचाकी (क्रमांक-एम.एच.१७ बी.टी.१५९९) हि चालविल्याबद्दल कोपरगाव शहर पोलिसानी गुन्हा दाखल केल्याने बेशिस्त नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जगात कोरोना या विषाणूने हजारो बळी घेतले आहे.यावर अद्याप उपचार नसल्याने या विषाणूने आपली जगात दहशत निर्माण केली आहे.त्यावर आपली सुरक्षा आपण घेऊन या रुग्णापासून बाजूला सुरक्षित राहणे व आपला बचाव करणे एवढाच उपाय असताना काही नागरिक अद्यापही आपल्या बेफिकिरीचे दर्शन घडवत आहेत.अखेर पोलिसांना आपला हिसका नाईलाजाने दाखवावा लागत आहे.

राज्यात २८ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८६ वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत, तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर–वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.जगात या विषाणूने हजारो बळी घेतले आहे.यावर अद्याप उपचार नसल्याने या विषाणूने आपली जगात दहशत निर्माण केली आहे.त्यावर आपली सुरक्षा आपण घेऊन या रुग्णापासून बाजूला सुरक्षित राहणे व आपला बचाव करणे एवढाच उपाय असताना काही नागरिक अद्यापही आपल्या बेफिकिरीचे दर्शन घडवत आहेत.अखेर पोलिसांना आपला हिसका नाईलाजाने दाखवावा लागत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.सुभद्रानगर येथील जेष्ठ नागरिक अनिल आमले हे वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून मास्क न लावताच बेफिकिरीचे जात असल्याची बाब लक्षात आल्याने कोपरगाव शहर पोलिस कॉ.अंबादास वाघ यांनी त्यांच्यावर गु.र.नं.११८/२०२० भा.द.वि.कलम १८८(२)२६९,२७१ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close