आरोग्य
होम कोरोंटाईन ग्रामस्थ फिरतात या… गावात !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूने जगभरात खळबळ उडून दिली असताना अद्यापही या बाबत काही नागरिक या आजाराबाबत काळजी करताना दिसत नाही त्याची किमंत अन्य ग्रामस्थांना चुकविण्याची साधार भीती कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील माजी सरपंच रावसाहेब टेके यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे गावातील नागरिक काळजीत पडले असून त्यांनी या बेशिस्त नागरींकांवर कारवाईची मागणी केली आहे.
वर्तमान परिस्थितीत वारी गावातील अनेक उच्च विद्या विभूषित तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,दौन्ड,नाशिक आदी अनेक शहरांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला आहे.त्या पैकी सुमारे १०६ लोक नुकतेच गावात आल्यावर आरोग्य विभागाने दक्षता म्हणून त्यांच्या हातावर कोरोना ग्रस्त संशयित (होम कोरोन्टाईन) म्हणून शिक्का मारलेले आहे.त्यांनी घरीच थांबणे आवश्यक असताना मात्र त्यांनी शासन आदेशकडे दुर्लक्ष केले आहे.
कोपरगाव तालुका तालुक्यातील सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेले प्रमुख मोठे गाव आहे .वर्तमान परिस्थितीत गावातील अनेक उच्च विद्या विभूषित तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,दौन्ड,नाशिक आदी अनेक शहरांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्याला आहे.त्या पैकी सुमारे १०६ लोक नुकतेच गावात आल्यावर आरोग्य विभागाने दक्षता म्हणून त्यांच्या हातावर कोरोना ग्रस्त संशयित (होम कोरोन्टाईन) म्हणून शिक्का मारलेले आहे.या नागरिकांनी वास्तविक आपल्या घरामध्ये निर्धारित वेळेपर्यंत आरोग्य विभाग सांगेल त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे.मात्र त्यांना या आजाराचे गांभीर्य अद्याप दिसत नाही.व ते गावात सकाळी,सायंकाळी निरोगी नागरिकासारखे पर्यटन करताना दिसत आहेत.
वास्तविक त्यांना कोरोना विषाणूची लागण आहेच असे नाही मात्र खबरदारी म्हणून व आपल्या पासून दुसऱ्याला या विषाणूची लागण व्हायला नको याची काळजी घेणे आवश्यक आहे.मात्र वारी गावात तसे होताना दिसत नाही ते राजरोस गावात किराणा,भाजीपाला,व अन्य चीजवस्तू घेण्यासाठी सैर करताना आढळत आहे.हि बाब धक्कादायक आहे.त्यामुळे गावातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.या नागरिकांवर आरोग्य विभागाने लक्ष देणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.या खेरीज त्यांच्यावर कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी लक्ष घालून या बेशिस्त नागरिकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.