जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोनाचा रुग्ण ! बनावट बातमीने खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात आज, “रिद्धि-सिद्धि कॉम्प्लेक्स मध्ये ‘डी’ विंग मधील रुम नं.१०१ मध्ये एका नाशिक मधील प्रसिद्ध दवाखान्यात नोकरी करत असलेल्या इसमास कोरोना विषाणूची लागण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रथम चाचणीत पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यांना ताप येत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील एका खाजगी हॉस्पिटल येथे नेण्यात आले” असल्याची बनावट बातमी सामाजिक संकेत स्थळावर टाकण्यात आल्याने कोपरगाव शहरत खळबळ उडाली आहे.याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी हि बातमी बनावट असल्याचा खुलासा करून या खोडसाळ नागरिकांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे.

काही खोडसाळ नागरिकांनी सामाजिक संकेतस्थळांवर “रिद्धीसिद्धी अपार्टमेंट ” (जे अस्तित्वातच नाही) त्याच्या नावावर राहणाऱ्या नाशिकच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करीत असलेल्या इसमास कोरोनाची लागण झाली असल्याची “असत्य” बातमी पसरविण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले या बाबत आमच्या प्रतिनिधीने नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्याशी संपर्क साधला असता अशी व्यक्ती व असे अपार्टमेंटच उपलब्ध नसल्याचे सांगून व अशा रुग्णाची कुठलीही नोंद नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे नसल्याचे सांगितले.

राज्यात २८ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८६ वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत, तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर–वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.या शनिवार पर्यंत राज्यातील १८६ कोरोनाबधित रुग्णांपैकी १०४ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. राज्यात शनिवारी ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. तर १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळय़ा विलगीकरण कक्षात आतापर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३३१९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर १८६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी तालुका प्रशासन व नगरपालिका प्रशासन या बाबत सतर्क आहे.मात्र आज दुपारच्या दरम्यान काही नागरिकांनी सामाजिक संकेतस्थळांवर “रिद्धीसिद्धी ” (अपार्टमेंट जे अस्तित्वातच नाही) त्याच्या नावावर राहणाऱ्या नाशिकच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करीत असलेल्या इसमास कोरोनाची लागण झाली असल्याची “असत्य” बातमी पसरविण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले या बाबत आमच्या प्रतिनिधीने नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्याशी संपर्क साधला असता अशी व्यक्ती व असे अपार्टमेंटच उपलब्ध नसल्याचे सांगून व अशा रुग्णाची कुठलीही नोंद नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे नसल्याचे सांगितले दरम्यान नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हि बाब कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हि बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी,”अशा प्रकारची व्यक्ती व अपार्टमेंट कोपरगाव शहरात नसल्याचे सांगून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये व अशी फेक बातमी इतर ग्रुपवर पाठवू नये” असे आवाहन केले आहे.व अशा असत्य बातम्या पसरविणाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close