जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

  …या विमानतळ प्रवासी टर्मिनलच्या निविदा प्रसिद्ध-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघातील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला चालना देवून विमान तळ विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी निधी मजूर करण्यात आला होता.त्याची  महायुती शासनाने तातडीने अंमलबजावणी करून या प्रवासी टर्मिनलच्या ५२७ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

शिर्डी विमानतळासाठी ४५ वर्ष जागेचा शोध थांबत नव्हता मात्र त्यासाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेऊन काकडी विमानतळ कृती समिती स्थापन करून त्या कामास जमीन मिळवून दिली आहे.त्यामुळे सन-२००६ नंतर जागेचा शोध थांबून या विमानतळाचे चाके काकडीत स्थिरावली होती.आता त्या ठिकाणी रात्री विमाने उतरणार आहेत.

शिर्डी विमानतळासाठी जागेचा शोध थांबत नव्हता मात्र त्यासाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेऊन काकडी विमानतळ कृती समिती स्थापन करून त्या कामास जमीन मिळवून दिली आहे.त्यामुळे सन-२००६ नंतर जागेचा शोध थांबून या विमानतळाचे चाके काकडीत स्थिरावली होती.आता त्या ठिकाणी रात्री विमाने उतरणार आहेत.

देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या देश विदेशातील असंख्य साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व त्यांचा वेळ वाचावा व मतदार संघातील दुष्काळी परिसर असलेल्या काकडी व परिसराचा विकास व्हावा या उद्देशातून तत्कालीन काकडी विमानतळ कृती समितीच्या माध्यमातून माजी आ.अशोक काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव मतदार संघातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले होते.या विमानतळाचे सन-२०१७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झाले होते.या विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी अनंत अडचणी येत होत्या.विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा देखील बंद होती अशा अनेक अडचणींच्या चक्रव्युहात काकडी विमानतळ सापडले होते.

त्याबाबत आ.काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने हे प्रश्न मांडले होते व अनेकवेळा मंत्रालयात बैठका देखील घेतल्या होत्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या देश विदेशातील साईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या,कार्गो सेवा सुरू व्हावी,नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी तसेच काकडी व परिसराचे प्रश्न सुटावेत यासाठी काकडी विमानतळासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांच्याकडून १५० कोटी निधी मिळविला आहे.तरीदेखील विमान तळाच्या विकासासाठी अधिक निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनल साठी ५२७ कोटी निधीस मजुरी दिली होती असा दावा केला आहे.या निधीतून होणाऱ्या प्रवासी टर्मिनलच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होवून शिर्डी विमानतळाच्या समस्या सुटणार असून काकडी परिसराचा वेगाने विकास मदत होणार असल्याचे त्यांनी म्हटले असून तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close