जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बाजार समितीने लिलावानंतर चोविस तासात रक्कम द्यावी-मागणी

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर सदरच्या रकमा व्यापारी विहित वेळेत देत नाही व शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास भाग पाडत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याने सदर ठिकाणीही शेतमाल लिलावानंतर शेतमाल रक्कम चोवीस तासात देण्यात  यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे पैसे तात्काळ द्यावे या प्रमुख मागणीसाठी ‘प्रहार जनशक्ती’च्या कार्यकर्त्यानी यांनी निवेदन दिले आहे.
“कोपरगाव बाजार समितीतील व्यापारी शेतकरी वर्गाचे पैसे तब्बल पंधरा दिवस वापरून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.याचे कारण त्यांनी जाहिर करणे  गरजेचे आहे.या बाबत बाजार समिती पदाधिकारी आणि संचालक आश्चर्यकारक मौन पाळत आहे हे आणखी धक्कादायक आहे.या सुल्तानी संकटाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्लक्ष केल्यास आपण बाजार समितीसमोर ‘ढोल बडावो आंदोलन’ कर”-संजय शिंदे,कार्याध्यक्ष,प्रहार जनशक्ती,अ.नगर जिल्हा. वर्तमानात सरकारने कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क वाढवले असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात तीन महिने पूर्ण होतील परंतु अद्यापही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे.अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना दिलासा मिळू शकत असतांना सरकारच्या निर्णयाने खोडा बसला आहे सदर कांदा निर्यातीवर शुल्क रद्द होणे गरजेचे आहे त्याचा फेरविचार गरजेचा असताना कोपरगाव कृषी उत्पन्न  बाजार समितीत शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल विक्रीचा पैसा विहित नियमाप्रमाणे चोवीस तासात मिळणे अभिप्रेत असताना व्यापारी त्याकडे दुर्लक्ष करत असून त्याकडे बाजार समिती त्याकडे कानाडोळा करीत आहे.त्यामुळे या सुल्तानी संकटांचा सामना कसा करायचा याचा  प्रश्न शेतकरी वर्गास पडला आहे.या पार्श्वभूमीवर आधी सर्व प्रथम शिवसेवा उद्धव गटाचे प्रवीण शिंदे यांनी ‘न्यूजसेवा’ पोर्टलच्या आवाज उठवला होता.व त्या नंतर ‘प्रहार जनशक्ती’ या पक्षाचे वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी नुकताच या प्रश्नास वाचा फोडली आहे. त्यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न  बाजार समितीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”कोपरगावसह राज्यात दुष्काळ पडल्याच्या जमा आहे.त्या मुळे आगामी काळात आपला प्रतिकूल काळ कसा कंठायचा याचा प्रश्न शेतकरी वर्गास जाचत आहे.त्यामुळे त्यांनी कांद्यास बरा भाव मिळत असल्याने तो विक्रीस काढला असता त्यास व्यापारी वर्गाच्या सुल्तानी संकटांचा सामना करावा लागत आहे.त्यांना शेतमाल विक्रीनंतर चोवीस तासात त्यास रक्कम मिळणे गरजेचे असताना त्याकडे व्यापारी वर्ग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून त्यांना शेतमाल विक्रीनंतर तब्बल पंधरा दिवसांनी त्याचे देयके देत असून बाजार समिती आणि त्यांचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहे.वास्तविक त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवड झालेली असताना त्याकडे ते कसे दुर्लक्ष करू शकतात असा सवाल त्यांनी विचारला आहे.अशा अनियमितता करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.मात्र शेतकरी वर्गाचे पैसे तब्बल पंधरा दिवस वापरून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.याचे कारण त्यांनी जाहिर करणे  गरजेचे आहे.या बाबत बाजार समिती पदाधिकारी आणि संचालक आश्चर्यकारक मौन पाळत आहे हे आणखी धक्कादायक आहे.या सुल्तानी संकटाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्लक्ष केल्यास आपण बाजार समितीसमोर ‘ढोल बडावो आंदोलन’ करू असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. सदर प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे पाटील जिल्हा संघटक अभिजित कालेकर,कोपरगाव शहर अध्यक्ष दिपक पठारे,प्रहारचे कलिम शेख,खडकी शाखाध्यक्ष सुरेश खरात,पापाभाई शेख,पढेगाव शाखाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे,राहाता तालुका अध्यक्ष दिनेश शेळके,वसंत काळे,विक्रम दाभाडे,किशोर कानकाटे,बबनराव डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close