गुन्हे विषयक
दोन गटात गज-काठ्यांनी तुंबळ हाणामारी,कोपरगावात उनाडांचा उच्छाद

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्या उनाड टोळ्यांचा उच्छाद पुन्हा एकदा सुरु झाला असून गांधीनगर येथील दोन टोळ्यात मोठी हाणामारी होऊन त्यात शीतल सुनील पगारे रा.इंदिरानगर हि महिला गंभीररित्या जखमी झाली असून पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यात एजाज सलीम शेख,साहिल गुलाब शेख,इरफान शकील शेख,ऋत्विक कुऱ्हाडेसह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध हिंदू जन आक्रोश मोर्चा,कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथांची विटंबना त्यानंतर होत असलेली आंदोलने,चासनळी येथील आदिवासी महिलेचा प्राथमिक उपचारा अभावी झालेला मृत्यू,त्यानंतर तहसील कार्यालयावर आलेला मोर्चा,उक्कडगावात महिलेचा झालेला मृत्यु या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेला तणाव पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच कोपरगाव शहरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे व त्यात असामाजिक तत्वांना कठोर शब्दात समज दिली होती.व सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या अपप्रवृत्ती विरुद्ध हद्दपारीसह कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असताना त्यापासून कोपरगाव शहर आणि तालुक्यातील असामाजिक तत्व कोणताही बोध घेताना दिसत नसताना व उलट अवैध व्यावसायिक पोलिसांना वाकुल्या दाखवताना दिसत असल्याची घटना कोपरगाव शहरातील गांधीनगर उपनगरात नुकतीच उघड झाली आहे.एरव्ही गांधीनगर,हनुमान नगर १०५,सुभाषनगर,खडकी नाका आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु असताना दिसत आहे.त्यामुळे वारंवार सामाजिक सलोखा बिघडवताना दिसत आहे.त्या विरुद्ध पोलिसांनी ज्या-ज्या वेळी कठोर पावले उचलली आहे.त्या त्या वेळी तेथे शांतता नांदलेली दिसली आहे.एरव्ही पोलिसांची ढिलाई कायम यांच्या अंगलट येताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण एक कि.मी.अंतरावर असलेल्या गांधीनगरचा पश्चिम भागातील फादरवाडीच्या दक्षिणेस श्री बोरावके यांची जमीन क्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काटवन आहे.या काटवनात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू,पत्ते,जुगार,फिरत्या चकऱ्याचा जुगार आदी अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरु असतात.त्या ठिकाणी त्या जुगारावरून दोन-तीन दिवसात अशा मारहाणीच्या घटना उघडकीस येत असतात.अशीच घटना काल रात्री घडली असून त्या ठिकाणी जुगार खेळत असताना एका युवकास काही तरुणांनी बेदम मारहाण केली त्याचे प्रत्यंतर त्याने आपल्या सहकारी मित्रांना बोलावून त्या ठिकाणी मारहाण करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या तरुणांना धडा शिकविण्याचे ठरवले होते.त्यातून हि हाणामारी झाली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्यांनी मग वरील ठिकाणी डॉ.आचारी हॉस्पिटल येथील चौकात रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा बेत पाहिला असून त्यातून हे ‘दगडविटांचे कांड’ घडले आहे.
दरम्यान आधी यात दुसऱ्या एका तरुणास धारणगाव रोडवर पोस्टानजीक असलेल्या चिकन टिक्क्याच्या गाडीवर मारहाण झाली होती त्यातून ते गुन्हा नोंदविण्यास गेले होते.मात्र त्याचा वाद आपसाआपसात मिटला होता.मात्र हे दुसरे ‘दगडकांड’ घडल्यावर त्यात पोलिसांनीं या दोन घटनातील तरुणांना गोवले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

या संबंधी रविवार दि.२७ ऑगष्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आचारी हॉस्पिटल मावळा चौफुली,गांधीनगर येथे दोन गटाचे काही टवाळ तरुण एकत्र येऊन त्यांनी बेकायदा जमाव जमवून त्या ठिकाणी शिवीगाळ करून लोखंडी गज,लाकडी दांडे,दगड,विटांचे तूकडे आदींचा यथेच्छ वापर करत एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता.त्यात एक महिला शीतल सुनील पगारे हि जखमी झाली आहे.हि खबर शहर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तो जमाव आटोक्यात आणला आहे.त्यासाठी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली व सौम्य लाठीमार करावा लागला असल्याची माहिती आहे हे विशेष !
दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी आरोपी एजाज सलीम शेख,साहिल गुलाब शेख,इरफान शकील शेख,ऋत्विक कुऱ्हाडे,वैभव मुकेश कुऱ्हाडे,चेतन जाधव,कुणाल भंडारी,पवन रोकडे,गुडी उर्फ विशाल गुलाब वाडेकर,सलीम लतीफ शेख,किरण शिवलाल लहीरे,फैसल कागद शेख,अबू शाबान शेख,गुलाब सांडू शेख,नकुल धर्मराज ठाकरे,अजय पाटील,भुऱ्या उर्फ करण गायकवाड,आदीं १७ जणांसह अन्य अनोळखी ४-५ जण आदींवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४१३/२०२३ भा.द.वि.कलम ३०८,३२३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर हे करत आहेत.