शैक्षणिक
…या विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यालयातील ७५ गरजू विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते स्कूल बॅग मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आल्या आहेत.

सदर प्रसंगी सुनील बोरा,डॉ.तुषार गलांडे,अमोल आढाव,मुकुंद इंगळे,अशोक आव्हाटे,विरेन बोरावके,प्रशांत वाबळे, गणेश लकारे,विकास बेंद्रे,योगेश निकम,भाऊसाहेब भाबड,फकीर कुरेशी,बाळासाहेब रुईकर,विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका राजेभोसले मंगल,पर्यवेक्षिका श्रीमती जगताप मॅडम,श्रीमती औताडे मॅडम,शहाजी सातव,चैतन्य ढगे,देवराम साबळे,किरण बोळीज,जयश्री आंबरे,श्रीमती मनिषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गरजू विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी असे उपक्रम राबवून मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करून स्कूल बॅग साठी अर्थसहाय्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.या ७५ स्कूल बॅग साठी सुनील बोरा,डॉ.तुषार गलांडे,अमोल आढाव यांनी आर्थिक सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद इंगळे यांनी केले आहे तर सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती मनिषा पाटील यांनी केले तर आभार काशिनाथ लव्हाटे यांनी मानले आहे.