जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात…या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा पालक मेळावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा शुक्रवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“नॅक या राष्ट्रीय संस्थेने आमच्या संस्थेच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाला सलग दोन वेळा ‘अ’ श्रेणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालय तसेच इतर संस्थांनी देखील विविध पुरस्कार देऊन गौरविले असल्याची माहिती दिली आहे”-अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मधुकर साबळे उपाध्यक्ष सुनील बोराडे,बाबासाहेब कर्डिले अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.व्ही.सी.ठाणगे,मेळावा-समन्वयक डॉ.एस.एल.अरगडे उपस्थित होते.

सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.यादव म्हणाले की “के.जे.सोमैया महाविद्यालय हे कोपरगाव तालुक्यातील उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले महाविद्यालय आहे.महाविद्यालयाने मागील दोन दशकात विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून अनेक सुविधा व अभ्यासक्रम सुरू केले आहेत.या सर्व बाबी पालकांनी बघाव्यात आणि आपल्या पाल्याला अध्ययनात काही अडचणी येत असल्यास त्या आमच्यासमोर मांडाव्यात त्यामुळे त्यातून मार्ग काढून आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या दूर करण्यात येतील असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मधुकर साबळे सविस्तर माहिती देताना म्हणाले की,“गेल्या दोन-तीन वर्षात कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे पालक मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला होता.त्यामुळे अनेक पालकांना आरोग्य आणि इतर कारणांनी सहभाग नोंदविता आला नव्हता.मागील वर्षापासून मेळावा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने घेतला जात आहे.त्यामुळे अधिकाधिक पालकांनी मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या पाल्याला येणाऱ्या अडचणी व त्यांचे भवितव्य याविषयी प्राचार्य,प्राध्यापक व संस्थाचालक यांच्याशी संवाद साधावा,त्यामुळे त्यातून सार्थक बाबी घडून येतील.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे म्हणाले की “नॅक या राष्ट्रीय संस्थेने आमच्या संस्थेच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाला सलग दोन वेळा ‘अ’ श्रेणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालय तसेच इतर संस्थांनी देखील विविध पुरस्कार देऊन गौरविले असल्याची माहिती दिली आहे.तरी या पालक मेळाव्यास बहुसंख्य पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव एड्.संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close