जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात…या विद्यार्थ्यांना सायकल वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव लायन्स क्लबच्या वतीने श्रीमान गोकुळचंद विदयालयातील गरजु विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोपरगांवच्या वतीने नुकत्याच श्रीमान गोकुळचंद विदयालयातील गरजु व होतकरु विदयार्थीना सायकल वाटप करण्यात आले असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी दिली आहे.

कोपरगाव लायन्स क्लब हा सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.शहरात त्यांनी नूकताच श्रीमान गोकुळचंद विदयालयातील गरजु व होतकरु विदयार्थीना सायकल वाटप केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीरामपुर येथील प्रसिध्द व्यापारी लायन्स आर.सी.सुनिल साठे हे होते.

सदर प्रसंगी राजेंद्र पटेल कोपरगांव येथिल लायन्स झेड.सी.सुधीर डागा,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,राजेश ठोळे आदीसह ट्रेझरर अंकुश जोरी,माजी नगरसेवक सत्येन मुंदडा,राजेंद्र शिरोडे,राजेश ठोळे,सुमित सिंगर,शाम जंगम,राम थोरे,अक्षय गिरमे,सचिन भडकवाडे नितीन भडकवाडे,सुरेश शिंदे,तुषार घोडके,प्रितम बंब,कैलास नागरे,आदी लायन्स क्लब कोपरगावचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी लायन्स क्लब सदस्य व मान्यवरांचे विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी स्वागत केले.संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,राजेश ठोळे,डाॕ.अमोल अजमेरे आदीनी लायन्स क्लब कोपरगांवचे या उपक्रमा बददल समाधान व्यक्त केले आहे.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब,कोपरगाव लायन्स क्लबचे सचिव लायन्स बाळासाहेब जोरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर आभार पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close