जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव शहरात वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील “स्थानिक के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयात तालुक्याचे माजी आ.के.बी.रोहमारे जन्मशताब्दीचे (१९२२-२०२२) औचित्य साधून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यावर्षी मंगळवार दि.०७ फेब्रुवारी रोजी भव्य प्रमाणात संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी दिली आहे.

दरम्यान सदर स्पर्धेसाठी स्पर्धकांनी माजी आमदार के.बी.रोहमारे:कार्य आणि कर्तृत्व,चला जाणू या नदीला,वेड मोबाईलचे:विस्मरण भविष्याचे,पर्यावरण बदल;शेतकरी हतबल आदी विषय असून स्पर्धकाने त्यापैकी एका विषयावर बोलायचे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सोमैय्या महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात दि.०७ फेब्रुवारी, २०२३ सकाळी १० वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक अमोल बागुल यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या सांघिक संघास के.बी.रोहमारे स्मृति-करंडक,कायमस्वरूपी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.तर वैयक्तिक प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकास रु.०९ हजार द्वितीय स्पर्धकास रु.०७ हजार तर तृतीय स्पर्धकास रोख रु.०५ हजार असे पारितोषिक देऊन गौरविले जाणार असून यावर्षी के.बी.रोहमारे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने उत्तेजनार्थ रुपये ०१ हजाराची पाच पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्वस्त संदीप रोहमारे,संस्थेचे सचिव अड्.संजीव कुलकर्णी,संयोजक,समन्वयक,संयोजन समितीचे सदस्य। प्रो.(डॉ.) के.एल.गिरमकर,प्रो.(डॉ.) एस. आर.पगारे,प्रो.(डॉ.)बी.बी.भोसले,प्रो.(डॉ.)व्ही.डी.आवारी,उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,डॉ.गणेश देशमुख,डॉ.एस.के.बनसोडे व महाविद्यालयातील सर्व सेवक प्रयत्नरत आहेत.इच्छुकांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रो.डॉ.जे.एस. मोरे-९८३४३१४३६७,प्रो.डॉ.व्ही.सी.ठाणगे-९८२२६७१७४५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close