शैक्षणिक
सेवानिवृत्त झालो तरी शाळा गुणवत्ता वाढीसाठी बांधिल-…यांचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त झालो.तरी मुलांच्या साथसंगतीचा लागलेला लळा यापुढेही सुटता सुटणार नसुन भावी आयुष्यदेखील शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी खर्ची करणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी लावरे यांनी सेवापूर्ती उक्कडगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“आपल्या काळात आपल्या जीवनातील खडतर प्रवास अल्पावधितच आत्मचरित्राच्या रुपाने शब्दबद्ध करुन वाचकांसमोर मांडणार असल्याचा संकल्प करून त्याचा गामी पिढ्यांसाठी नक्कीच उपयोग होईल”-शिवाजी लावरे,मुख्याध्यापक,सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालय,उक्कडगाव.
उक्कडगाव येथील आपल्या माध्यमिक सेवेतील सलग तिस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांचा सेवानिवृत्तीची कार्यक्रम त्यांच्या हिंचिंतकानी आयोजित केला होता.त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे होते.
सदर प्रसंगी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख,सरपंच कल्पना निकम,विजय शेटे,सुनिल पंडीत, बबन निकम,अॕड.गणेश मोकळ,अॕड.योगेश खालकर,कचरु डिके,अॕड.विश्वेश्वर पठाडे,अॕड.प्रदीप चंदने,आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध शाळा,विद्यालयांचे शिक्षक,माजी विद्यार्थी पालकांसह सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपल्या जिवनातील खडतर प्रवास अल्पावधितच आत्मचरित्राच्या रुपाने शब्दबद्ध करुन वाचकांसमोर मांडणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलुन दाखवला.यावेळी राजेश परजणेंसह अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व्ही.ए.शेळके,सुत्रसंचालन ए.के.राजगुरु शेवटी उपस्थितांचे आभार बाळासाहेब नेहे यांनी मानले आहे.