कोपरगाव तालुका
पेन्शनर्स संघटनेचे प्रश्न लवकरच मार्गी लावू-…या नेत्याचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पेन्शनर्स संघटना चांगले काम करत असून त्यांचे कार्यालयाचे काम मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार करू व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची वेळ घेऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिले आहे.

सदर प्रसंगी नूतन नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप ढेपले,कार्याध्यक्ष पदी गोपीचंद इंगळे,तर सरचिटणीस पदी अरुण धुमाळ यांची निवड करण्यात आली व ढेपले यांना अन्य कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे.त्यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

अ. नगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कोपरगाव शाखेच्या वतीने समता सभागृहात त्रैवार्षिक अधिवेशन आज दुपारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द.मा.ठुबे हे होते.
सदर प्रसंगी गोदावरी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व प्रशासक सचिन सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष दशरथ ठुबे,उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक बागुल,उपाध्यक्ष बन्सी उबाळे,जगन्नाथ काळे,रावसाहेब पवार,रंगनाथ बागल,श्रीरामपुरचे तालुकाध्यक्ष रा.ए.पवार गुरुजी,ठोंबरे गुरुजी,राहता तालुकाध्यक्ष लावरे गुरुजी,जिल्हा उपाध्यक्ष काळे गुरुजी,भागवत गुरुजी,पंडोरे सर,संतुजी वाकचौरे,आर.के.ढेपले,ढोले गुरुजी,खंडिझोड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

“ज्यांची प्रलंबित देयके देत आहे.त्यांच्या समस्या आगामी सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे.तुमच्या बैठका पंचायत समिती सभागृहात करा त्यासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ फक्त आधी दोन दिवस कल्पना द्या”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी व प्रशासक,कोपरगाव पंचायत समिती,कोपरगाव.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”तुम्ही समाजाच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत.मात्र अलीकडील काळात हा उद्देश लोप पावत चालला असल्याचा खेद व्यक्त केला आहे.आज इंग्रजी माध्यम व सी.बी.एस.सी.च्या शाळा वाढल्या आहेत.त्यातुन सामान्य वर्गाच्या आर्थिक कक्षेच्या बाहेर शिक्षण गेले आहे.असल्याचं निदर्शनास आणून दिले आहे.संघटनेचे काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.व स्वतः स्वावलंबी राहण्याचे काम करावे असे आवाहन करून शिक्षकांना व जेष्ठांना उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहे.
गटविकास अधिकारी सूर्यवंशी म्हणाले की,”आपण नागपूरला असताना आपणाकडे अडीच हजार पेन्शनर्स होते कोपरगाव येथे केवळ २५० आहे.मात्र ते सातत्याने पाठपुरावा करतात याकडे त्यांनी लक्षवेधले आहे.जेष्ठांची सेवा करताना कर्मचाऱ्यांनी उपकाराची भावना ठेऊ नये आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांत बरेच बदल केले आहे.त्यांचेच कामाचे पैसे आपण देतो याची जाणीव करून दिली असल्याचे सांगितले आहे.आपण जेष्ठांचे विचार ऐकून त्यांची विचारपूस व सुखद अनुभव दिले आहे.आपल्याकडे राहात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.व ज्यांची प्रलंबित देयके देत आहे.त्यांच्या समस्या आगामी सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे.तुमच्या बैठका पंचायत समिती सभागृहात करा त्यासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ फक्त आधी दोन दिवस कल्पना द्या असे आवाहन केले आहे.वर्तमानात आपल्याकडे सभापतींचा अतिरिक्त कार्यभार आहे त्याचाही आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन शेवटी दिले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गोपीनाथ इंगळे यांनी केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”पेन्शनर्स असोसिएशनकडे जागा बाजार तळावर आहे.जवळपास आठ ते दहा लाखांचा निधी आहे.मात्र त्यासाठी कार्यालय होणे गरजेचे आहे.अनेक कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे देयके प्रलंबित आहे त्याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे.
कोपरगाव तालुकाध्यक्ष दिलीप ढेपले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी अनेक महिला शिक्षकांचे कोरोना काळात देयके प्रलंबित आहे त्यांना ते लवकर द्यावे थकीत वेतन द्यावे आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.तर सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष गोपीनाथ इंगळे यांनी केले तर आभार ठोंबरे गुरुजी यांनी मानले आहे.