शैक्षणिक
कोपरगावात..’त्या’विद्यार्थ्यांना हेल्पिंग हॅन्ड मार्फत होणार आर्थिक मदत-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीच्या कालखंडात आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना या वर्षीही कोपरगाव शहरातील हेल्पिंग हँड्स हि संस्था मदत करणार असून येत्या रविवार दि.२९ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव शहरातील लायन्स पार्क हॉल येथे धनादेश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष व लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
ज्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे व ज्यांना १ वर्षाच्या आतील व्यावसायिक कोर्स करून पुढील शिक्षण “कमवा व शिका” या पद्धतीने करावयाचे आहे अशा १५ मुलांना कोर्स फी,हॉस्टेल फी किंवा मेस बील भरणेसाठी प्रत्येकी रु १० हजारांची मदत करणार आहे.या वर्षी एकूण ३२ मुलांसाठी एकूण रुपये ४ लाख ९० हजार खर्च करण्यात येणार”-दत्तात्रय खेमनर,लेखा परिक्षक व अध्यक्ष हेल्पिंग हॅन्ड.
कोपरगाव शहरातील हेल्पिंग हँड्स हि संस्था मूळ तालुक्यातील वेस येथील रहिवासी असलेले लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी स्थापन केली असून त्या मार्फत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत दिली जात आहे.
यावर्षी धनादेश वाटपाचा कार्यक्रम प्रासिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.जी.गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली तर धारवाडचे आय.आय.टी.चे माजी विद्यार्थी सूरज दुर्गेष्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.सदर प्रसंगी प्रसिद्ध कीटक तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,डॉ.जी.सी.हुसळे,विठ्लराव शिंदे,फकीर लोढा,भाऊ थोरात,प्रा.गणेश देशमुख यांच्या प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”या वर्षी आपण हेल्पिंग हँड्स या आपल्या संस्थेतर्फे उच्च शिक्षणा साठी ज्या जुन्या १७ मुलांचे शिक्षण चालू आहे.त्या मुलांना महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी साधारणपणे प्रत्येकी रूपये २० हजार रुपये या प्रमाणे मदत करणार आहे.या कार्यक्रमास कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांमध्ये संपन्न होणार आहे.व नवीन १५ मुलांना ज्यांना १२ वीला ६०% पेक्षा जास्त गुण आहेत व ज्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे व ज्यांना १ वर्षाच्या आतील व्यावसायिक कोर्स करून पुढील शिक्षण “कमवा व शिका” या पद्धतीने करावयाचे आहे अशा १५ मुलांना कोर्स फी,हॉस्टेल फी किंवा मेस बील भरणेसाठी प्रत्येकी रु १० हजारांची मदत करणार आहे. म्हणजे या वर्षी एकूण ३२ मुलांसाठी एकूण रुपये ४ लाख ९० हजार खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही हेल्पिंग हँड्सचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी शेवटी दिली आहे.