जाहिरात-9423439946
शैक्षणिक

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा यशस्वी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी विद्यालयात बाजी मारत कु.संजना चेतन भुतडा हिने ९७ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

समता इंटरनॅशनल स्कूल सलग ४ थ्या वर्षी अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुन्हा एकदा समता पॅटर्न यशस्वी केला आहे.कोरोनासारख्या साथीच्या काळात कोणत्याही प्रकारचे परीक्षेबरोबरच कोरोनाचे मानसिक दडपण न घेता परिस्थितीनुरूप अभ्यास करत समता इंटरनॅशनल स्कूलचे २०१९-२० च्या इयत्ता १०वी चे विद्यार्थी सी.बी.एस.ई. पुरस्कृत अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली आहे- समता इंटरनॅशनल स्कूल- संस्थापक ओमप्रकाश कोयटे

संजना भुतडा ही श्रीरामपूरचे सुप्रसिध्द वास्तुविशारद चेतन भुतडा यांची कन्या आहे.तेजस सचिन आहेर याने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर सुयोग मनिष कोठारी याने ९५.८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला,समता स्कूलचे या वर्षी ६८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. समता स्कूल मधील ७ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यामध्ये कु.संजना भुतडा,तेजस आहेर,सुयोग कोठारी,कु.कृतिका गोंदकर,सिद्धांत नरवडे,चि.सी जगताप,शंतनू होन आदि विद्यार्थांचा समावेश आहे.

आदिशा ठोळे,राज गांधी,तेजस कवडे,तीर्थ ठोळे,भूमिका कदम,वैष्णवी गोरे,ख़ुशी भुतडा,तनिष्का अग्रवाल,शांभवी राहतेकर,योगेश्वरी गाडे,रेहान अत्तर हर्षदा कवडे,नेतल लाहोटी,वसू अग्रवाल,तेजल वहाडणे,क्रिश पोरवाल या २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे. ८५ टक्के च्या पुढे गुण मिळविणारे ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात सायली तागडे या विद्यार्थिनीने हिंदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.या विद्यार्थिनीस हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.आढाव यांचे मार्गदर्शन लाभले होते.
या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य,शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन उपप्राचार्य विलास भागडे,उपप्राचार्या सौ.शैला झुंजारराव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close