शैक्षणिक
यशासाठी प्रयत्न आणि चिकाटी आवश्यक -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न,सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच तुम्हाला यशाची प्राप्ती होईल असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान यावेळी तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत लक्षवेधी यश संपादन केलेले विद्यार्थी पालक आदींचा सत्कार करण्यात आला आहे.पालकांनी आ.काळे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कोपरगाव यांच्या वतीने कलश मंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदार संघातील ईयत्ता दहावी,बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये लक्षवेधी यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य ‘गुणगौरव सोहळा’ आज सकाळी १० वाजता आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायणराव मांजरे,ज्ञानदेव मांजरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, गौतम बँकेचे उपाध्यक्ष विजय रक्ताटे, कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे,सचिन चांदगुडे,शंकरराव चव्हाण,श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे,प्रशांत घुले,सुनिल मांजरे, वसंतराव आभाळे,विष्णू शिंदे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण,जिनिंग व प्रेसिंगचे संचालक शिवाजी शेळके,महेश लोंढे,गौतम बँकेचे संचालक शिरीष लोहकणे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर,नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे,जनार्दन कदम,सोमेश आढाव, संदिप कपिले,विजय त्रिभुवन,राहुल शिरसाठ, वाल्मिक लहिरे,सोमनाथ आढाव,सुनिल शिलेदार आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,गुणवंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे.गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास त्यांना भविष्यात अजून यशाची मोठी शिखरे सर करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.आजचा हा गौरव केवळ विद्यार्थ्यांचा नाही तर त्यांना अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा आणि त्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचा देखील आहे.आजची तरुण पिढी हेच उद्याचे भविष्य असून विद्यार्थ्यांनी केवळ पद आणि संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर देशाच्या उभारणीसाठी आपल्या ज्ञानातून काय योगदान देवू शकतो याचा विचार केला पाहिजे.पुढील शिक्षण घेताना नवीन सवंगडी निवडतांना योग्य व्यक्तीची निवड करा.तुम्हीं मिळविलेल्या यशातून आपल्या गावाचा,तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभिमान वाढला पाहिजे याची जाणीव ठेवा.मोठे व्हा,पण आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवा असे शेवटी सांगितले आहे.
यावेळी सुप्रसिद्ध हास्य कवी म्हणले कि,”हे स्पर्धेचे युग आहे शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आवाहन आहेत.त्यमुळे मिळविलेल्या पदवीबरोबरच स्वतःच्या अंगी असलेली कला जोपासा त्या कलेचा तुमचे भविष्य उज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.मराठी भाषा हि जगात सगळ्यात चांगली भाषा आहे.हि भाषा जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.बाहेरच्या देशात राहणारी मराठी माणस मराठी अस्मिता जपत आहे.याचा खूप अभिमान वाटत असल्याचे सांगून आयुष्यात पहिल्यांदा गोदामाईच्या कुशीत वसलेल्या कोपरगाव नगरीत आलो.विविधतेने नटलेले हे गाव अतिशय समृद्ध आहे.कर्मवीर शंकरराव काळे यांना देखील भेटल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.आ.काळे अतिशय शांत आणि राजबिंड व्यक्तिमत्व आहे.ते आवर्जून गुणवंतांचा सत्कार करतात हि कौतुकास्पद गोष्ट आहे.कार्यक्रमाची गर्दी बघून मराठीपणाचा अभिमान वाटत असून हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी प्रास्तविक केलेl तर उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी सूत्रसंचालन केले आहे तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी मानले आहे.



