शैक्षणिक
…या विद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगीरी केली असून या शाळेचे तब्बल ९२ विद्यार्थी गुणवत्ता यादित झळकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सलग अकराव्या वर्षी या शाळेने राज्यपातळीवरील आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे.पुढील चार वर्षात या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रूपये याप्रमाणे एकूण ४४ लाख रूपये रकमेची शिष्यवृत्ती मिळेल अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“सलग अकराव्या वर्षी आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकूलाने एन.एम.एम.एस.परिक्षेत राज्यात आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला.विशेष तयारी वर्ग,सुपर नाईट अभ्यासिका,सुवर्ण पहाट अभ्यासिका,स्मार्ट सण्डे उपक्रम,तज्ज्ञांचे मार्गदर्शन,विद्यार्थी दत्तक योजना या सारख्या गुणवत्ता वर्धक उपक्रमांमुळे हे यश मिळते आहे.-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,विश्वात्मक,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता ८वीत शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची एक परीक्षा आहे.या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ९वी ते १२वी पर्यंत प्रतिवर्ष ₹१२,००० (दरमहा ₹१,०००) शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्तीत यश मिळवणारी आत्मा मलिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अव्वल ठरले आहे.दरम्यान याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की,”यंदा परीक्षेचे गुणवत्तेचे (मिरिट) हे आजपर्यंतचे सर्वोच्च आहे.तरीही आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवरील आपला पहिल्या क्रमांक यंदाही कायम ठेवला.या परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाचे आजपर्यंत एक हजार सातशे बहात्तर विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यांनी आठ कोटी पन्नास लाख छप्पनन्न हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सचिन डांगे,अनिल सोनवणे,बाळकृष्ण दौंड,रवींद्र देठे,मिना नरवडे,रमेश कालेकर,तसेच पर्यवेक्षक गणेश रासने,नयना आदमाने,सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले होते.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,मीरा पटेल आदिंनी अभिनंदन केले आहे.



