जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयाचे छात्र सेनेचे लक्षवेधी यश!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरती २०२५-२६ चा अंतिम निकाल लागला असून,यामध्ये के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तीन विद्यार्थिनी अनुक्रमे,कु.आरती राजेंद्र जगताप,कु.मेघा विजय वाघमारे व कु.कांचन बाबासाहेब वाघमारे यांनी लक्षवेधी यश मिळवत पोलीस दलात प्रवेश करण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

   कु.आरती राजेंद्र जगताप हिची संभाजीनगर पोलीस,कु.मेघा विजय वाघमारे हिची बीड पोलीस म्हणून निवड झाली आहे तर कु.कांचन बाबासाहेब वाघमारे हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे.अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन्ही टप्प्यांत कामगिरी करून त्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे,”अशी माहिती प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी येथे दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (मुली) प्रमुख प्रा.वर्षा आहेर म्हणाल्या की,”कु.आरती राजेंद्र जगताप,कु.मेघा विजय वाघमारे व कु.कांचन बाबासाहेब वाघमारे या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिक असून त्या अनुक्रमे तृतीय वर्ष कला,तृतीय वर्ष वाणिज्य,पदव्युत्तर प्रथम वर्ष या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे यांचेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close