जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात,’एकात्म मानव दर्शन’ उपक्रम संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच,’ एकात्म मानव दर्शन’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

"एकात्म मानव दर्शन ही विचारधारा एकात्मतेचा संदेश देणारी असून समाजातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत ती पोहोचली पाहिजे" - प्राचार्य,विजय ठाणगे, कोपरगाव. 

     पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार व्यक्ती,समाज आणि निसर्गाच्या एकात्मतेवर आधारित आहे,जो मानवी जीवनाच्या सर्वांगीण (शरीर, मन, बुद्धी, आत्मा) विकासावर भर देतो. ही तत्त्वे आजच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा गाभा आहेत,जी आर्थिक,सामाजिक आणि तांत्रिक स्वावलंबनाद्वारे ‘अंत्योदय’ आणि विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणतात.या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धा व व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले होते.एकात्म मानव दर्शन ही विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

   सदर प्रसंगी प्रा.जे. एस.मोरे,डॉ.एम.बी.खोसे,प्रा.एस.बी.कुटे,प्रा.किरण सोळसे,प्रा.आदिती देशमुख,प्रा.अमोल चिने,रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

   या दोनही स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची निवड जिल्हा पातळीवर संपन्न होणार्‍या स्पर्धेसाठी झाली आहे.या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन सत्रासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे माध्यम व्यवस्थापक सागर आहिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.सागर आहिरे यांनी आपल्या मनोगतात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची व विचारांची माहिती देतांनाच एकात्म मानव दर्शनाची संकल्पना स्पष्ट केली आहे.

  सदर स्वागत मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे यांनी या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा तसेच मार्गदर्शन सत्राचे कौतुक केले.एकात्म मानव दर्शन ही विचारधारा एकात्मतेचा संदेश देणारी असून समाजातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत ती पोहोचली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.या मार्गदर्शन सत्रात प्रा.रविंद्र जाधव यांनी एकात्म मानव दर्शन या विषयावर आपले विचार मांडताना ही विचारधारा व आजचा समाज यावर परखड विचार व्यक्त केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय दवंगे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविका कु.वैष्णवी गवळी व कु.संस्कृति चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close