जाहिरात-9423439946
शैक्षणिक

ग्रामविकासासाठी विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन बदलावा-आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

   राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून कौशल्य,नेतृत्व,संघटन आणि सामाजिक जबाबदारीची ओळख होते.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा ग्रामविकासासाठी फायदा करावा व त्यातून मिळवलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून गावाला समृद्ध करावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांनी नुकतेच केले आहे.

 

“अभंग,गवळणी आणि भारूड महाराष्ट्राची संकृती आहे.युवकांनी नवीन पद्धतीने हि संस्कुती आपल्या कलेच्या माध्यमातून जोपासली पाहिजे.भारूडातून जनजागृती होत असून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे”-भानुदास बैरागी,भारुड सम्राट.

   पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे शुशिलामाई काळे महाविद्यालय गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या.

   सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे,सोपान आभाळे,सरपंच सुनील भागवत,उपसरपंच बिपीन गवळी,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रदीप कुऱ्हाडे,प्रकाश आभाळे,शंकरराव आभाळे,विलास निंबाळकर,कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे निरीक्षक नारायण बारे,रवींद्र आभाळे,ग्रामपंचायत सदस्य अशोक आभाळे,वसंत भागवत,ग्रामपंचायत अधिकारी व्ही.डी.सांबारे,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,प्रा.डॉ.पल्लवी मोरे स्वयंसेवक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”समाजाला युवकांकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम युवकांचे आहे.राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून नवीन पिढी घडवली जात आहे.आपल्या शिक्षणाचा आणि कला गुणांचा समाजाला फायदा कसा होईल यावर स्वयंसेवकांनी भर दिला पाहिजे.आपले आणि आपल्या कुटुंबाचे, महाविद्यालयाचे,जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव मोठे करण्याचा ध्यास घेण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माणुसकी धर्माचा अर्थ जाणतो,श्रम,निष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो या विद्यापीठ गीताच्या ओळी अंगीकारून श्रमाचे महत्व जाणावे व माणुसकी धर्म जोपासावा त्याचा तुम्हाला पुढील जीवनात नक्कीच फायदा होईल.या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होणार असून विद्यार्थ्यांनी विविध चर्चा सत्रांच्या माध्यमातून वक्त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले कर्तृत्व सिध्द करून लौकिक मिळवावा असे आवाहन शेवटी केले आहे.

   याप्रसंगी उपस्थित असलेले प्रसिद्ध भारुड सम्राट भानुदास बैरागी यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांना आणि उपस्थितांना भारुडाचे महत्व आणि भारूडातून जनजागृती कशी होते याची माहिती दिली.अभंग,गवळणी आणि भारूड महाराष्ट्राची संकृती आहे.युवकांनी नवीन पद्धतीने हि संस्कुती आपल्या कलेच्या माध्यमातून जोपासली पाहिजे.भारूडातून जनजागृती होत असून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे शेवटी सांगितले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल पोटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर आभार प्रा.भीमराव रोकडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close