जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनोरंजन

रक्त जोडायला शिका ,,,रक्त पाडायला नको-ह.भ.प.अनिल महाराज पाटिल

जवळ्यात अखंड हरीनाम सप्ताहाची ऊत्साहात सांगता

अआनंद हा प्रत्येकाच्या जीवनातला स्थायी भाव असून सुखाची प्रत्येक जीवाला इच्छा असते त्यामुळे  जीवनात आपल्याबरोबर संपूर्ण जगाला आनंद मिळाला पाहिजे असे ज्यांना वाटते व त्यासाठी जे सतत झटत राहतात त्यांना संत म्हटले जाते असे प्रतिपादन  हभप अनिल महाराज पाटील यांनी व्यक्त केले

जवळा ता पारनेर येथे गेल्या सात दिवसापासून अविरत पणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि २३ मार्च रोजी शनिवारी झाली अध्यात्म ,बरोबरच ,परमार्थ, व त्यातून समाजप्रबोधन आशा त्रिवेणीचा मेळ घालत  आपल्या सुस्पष्ट वाणीतून पाटील महाराजांनी उपस्थित श्रोत्यांना मनातुन अंतःकरणाला भिडणारी ज्वलंत उदाहरणे देत  सुमारे दोन तास जागेवर खिळवून ठेवले श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत टाळ्या वाजवून साथ देत होते  त्यामुळे कीर्तनाला चांगलाच रंग भरला
मंदिराची पूर्णतः ही जशी कळसावर अवलंबून असते तशी माणसाची पूर्णतः ही परमर्थात आहे ,,चित्र बदला असा संदेश देताना त्यांनी  एक न्याय सुनेला व एक न्याय लेकीला असे न वागता दोघींनाही समान न्यायाने वागवा रक्त जोडायला शिका,,, रक्त तोडायला नको,,जीवनात  परमार्थ, दानधर्म  करा अध्यत्म जोडा,  शेवटी भोग तसाच राहतो भोगता नष्ट होतो त्यामुळे माणसाशी माणसासारखे माणुसकीने वागा असा मोलाचा सल्ला दिला
आज महाराष्ट्रातला माणुसपणा दिसतोय तो फक्त वारकरी सांप्रदयामुळे व समाज सुधारणेत सांप्रदयाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close