शैक्षणिक
…या गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जाहीर केल्या प्रमाणे नुकताच कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी पदावर बढती झाली आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत आणले व शाळा लौकिकास आणली असल्याने त्यांचा जवळके येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे.
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदले जाणे आवश्यक आहे.तसेच पटावर नोंदवलेला प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून त्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हक्क कायद्याने मान्य केला आहे.शाळा बालकांचे भावविश्व घडवते.सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडणघडणीत शाळेचे स्थान महत्त्वाचे आहे.त्यामुळे हसत-खेळत शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.दीर्घ सुट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी,यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.शाळेचा परिसर स्वच्छ,सुंदर,हिरवागार आणि प्रेरणादायी असल्यास सुट्यानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल.चैतन्य आणि उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी,या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद देच्या शाळेत हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.

दरम्यान जवळके येथील शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता व शिष्यवृत्ती यादीत येण्याचे प्रमाण मोठे असून ही शाळा खाजगी शाळांना सरस असल्याचे वारंवार सिद्ध झाले असून ती या परिसरात नावाजलेली समजली जात आहे.त्यामुळे या शाळेत विद्यार्थी येण्याचे प्रमाण मोठे आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,शाळा निरीक्षक ऋषिकेश बोरुडे,माजी उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,नवनाथ शिंदे,ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी थोरात,शाळा समितीचे अध्यक्ष संदीप थोरात,राजेंद्र थोरात,बबन शिंदे,विजय शिंदे,भाऊसाहेब थोरात,दशरथ सरवार,सचिन वाकचौरे,शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,शिक्षक निवृती बढे,जानका देवकर,रवींद्र गोसावी,कोमल बागुल,सुरेखा उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका थोरात यांचे हस्ते पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्याना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तके प्रदान करण्यात आला आहे.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात आला आहे.प्रारंभी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान जवळके येथील शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता व शिष्यवृत्ती यादीत येण्याचे प्रमाण मोठे असून ही शाळा या परिसरात नावाजलेली समजली जात आहे.त्यामुळे या शाळेत विद्यार्थी येण्याचे प्रमाण मोठे आहे.नजीकच्या धोंडेवाडी,अंजनापुर,बहादराबाद,वेस आदी ठिकाणाहून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असल्याची माहिती सरपंच सारिका थोरात यांनी दिली आहे.सदर प्रसंगी प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनी आणि केले आहे.तर सूत्रसंचालन निवृत्ती बढे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार रवींद्र गोसावी यांनी मानले आहे.
दरम्यान यावेळी येथील शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी पदावर बढती झाली आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत आणले व शाळा लौकिकास आणली असल्याने त्यांचा जवळके येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.