जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…’या’ विद्यालयाचे पी.एम.यशस्वी शिष्यवृत्तीत लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   दिली येथील भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पी.एम.यशस्वी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज,कोकमठाण या संस्थेने लक्षवेधी यश मिळवले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

दरम्यान आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलची
हि कामगिरी महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळांमध्ये उल्लेखनीय मानली जात आहे.दरम्यान गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये 57 विद्यार्थ्यांनी एकूण 1 कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळवून राज्यस्तरावर एक विक्रम प्रस्थापित केला असल्याचे मानले जात आहे.

  पी.एम.यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही ओबीसी,ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती योजना आहे,जी उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करते.या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते,ज्यात राहण्याचा खर्च (3000 रुपये प्रति महिना) देखील समाविष्ट आहे.या योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि विमुक्त,भटक्या जमाती या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना नववी ते बारावी इयत्तेत शैक्षणिक स्कॉलरशिप दिली जाते.या अनुषंगाने,आत्मा मालिक गुरुकुलने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 14 विद्यार्थ्यांना एकूण रुपये 4 लाख 48 हजार शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे.तर 2024-25 मध्ये 43 विद्यार्थ्यांची निवड होऊन तब्बल रू.13 लाख 76 हजार इतकी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.एकंदरित आतापर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ₹18 लाख 24 हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

   ही कामगिरी महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळांमध्ये उल्लेखनीय मानली जात आहे.दरम्यान गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये 57 विद्यार्थ्यांनी एकूण 1 कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळवून राज्यस्तरावर एक विक्रम प्रस्थापित केला असल्याचे मानले जात आहे.

   या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिष्यवृत्ती धारकांचे जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,प्राचार्य माणिक जाधव,उपप्राचार्य नितिन सोनवणे, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या मिनाक्षी काकडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक मंडळींनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close