जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शासकीय चित्रकला स्पर्धेत…ही शाळा अव्वल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव- (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश प्राप्त केले आहे.दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

   

शासकीय इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पंधरा विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ४४ विद्यार्थ्यांनी ” ब” श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच एलिमेंट्री परीक्षेमध्ये शाळेचे एकूण ११७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यामध्ये ०९ विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ७९ विद्यार्थ्यांनी  “ब ” श्रेणी प्राप्त केली आहे.

या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कलात्मक गुण विविध स्पर्धा आणि परीक्षांद्वारे चमकवण्याचा प्रयत्न गौतम पब्लिक स्कूलमध्ये केला जात आहे.त्यामुळे गौतम पब्लिक स्कूल शिक्षणाबरोबरच कला,क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवून असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले आहे.

शासकीय इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पंधरा विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ४४ विद्यार्थ्यांनी ” ब” श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच एलिमेंट्री परीक्षेमध्ये शाळेचे एकूण ११७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यामध्ये ०९ विद्यार्थ्यांनी “अ” श्रेणी व ७९ विद्यार्थ्यांनी  “ब ” श्रेणी प्राप्त केली आहे. सन २००६ पासून गौतम पब्लिक स्कूलच्या १००% निकालाची परंपरा कायम राहिली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सर्व सदस्य, प्राचार्य नूर शेख व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close