जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ पातळीवर निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जळगाव येथे झालेल्या डी.बी.ए.टी.यू. विद्यापीठाच्या अंतर विभागीय फेन्सिंग स्पर्धा मध्ये कु.कार्तिक मोरे यांनी प्रथम क्रमांक व कु.यशराज पानसरे आणि कु.दर्शन नाईक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कु.भुजबळ साईराज याचे इंद्रायणी महाविद्यालय पुणे मध्ये क्रिकेट मध्ये निवड झाली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सर्व विजेत्यांचे डी.बी.ए.टी.यू.विद्यापीठामध्ये निवड झाल्या बद्दल आर.जे.एस ग्रपू ऑफ इन्स्टिट्यूट व आर.जे.एस.स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक अभिनंदन केले आहे.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्रीडा आणि कलात्मक असा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असते.त्यातूनच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन,कला आणि क्रिडा गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.

तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये उज्वल यश प्राप्त होत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यानीचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे,विश्वासू विजय कडू,दिपक कोटमे तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्य उषा जैन क्रिडा प्रमुख चव्हाण सचिन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सदर यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close