जाहिरात-9423439946
निवड

…या कारखान्याच्या उपाध्यक्षांची निवड संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  सहकारात अग्रणी असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगवंता परजणे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची बातमी प्राप्त झाली आहे. माजी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आपला राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

नवोदित उपाध्यक्ष परजणे यांचा सत्कार करताना बिपीन कोल्हे.

दरम्यान यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कारखान्याचे अध्यक्ष  विवेक कोल्हे यांनी नवोदित उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आदींचा सत्कार केला आहे.

  सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी ठरलेल्या आवर्तनाच्या नियमाप्रमाणे आपला राजीनामा सोपवला होता.त्यानंतर सहकार विभागाने ही निवडणूक जाहीर केली होती.यावेळी
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे,सहायक उमेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.ज्ञानेश्वर परजणे यांच्या नावाची सुचना राजेंद्र कोळपे यांनी केली तर त्यास संचालक बाळासाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले आहे.

   दरम्यान नूतन कारखान्याचे उपाध्यक्ष परजणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close