जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चंद्रभागाबाई भुजाडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दहे यांच्या सासूबाई व मूळ आपेगाव येथील रहिवासी चंद्रभागाबाई कोंडीराम भुजाडे (वय-९०) यांचे आज दुपारी ०४ वाजता निधन झाले आहे.त्यांच्यावर उद्या सकाळी ८.३० वाजता संवत्सर येथील पवित्र गोदावरी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक नातू,दोन नाती असा परिवार आहे.

 

गं.भा.चंद्रभागाबाई भुजाडे यांच्या पतीच्या निधनांनंतर मुलाचे अपघातात निधन झाले होते.त्यांनी तो मोठा धक्का पचवला होता.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून संवत्सर आणि आपेगाव परिसरात परिचित होत्या.

त्यांच्या निधनाने महानंद चे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्या गतपंधरा वर्षांपासून आपल्या मुलीकडे व जावयाकडे रहात होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close