व्यापार विषयक
…या ठिकाणी कृषिमाल निर्यात परिषद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानली जात असून आर्थिक सुधारणांचा एक भाग म्हणून,सरकारने अनेक आर्थिक धोरणे तयार केली असून त्यामुळे देशाचा हळूहळू आर्थिक विकास होत असला तरी यात ग्रामीण भागात अद्याप मोठी संधी असल्याचे ओळखुन पुण्यातील ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ संस्थेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना निर्यात प्रधान बनविण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी आगामी रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे “कृषिमाल निर्यात परिषद” कृषी आयुक्तालयाचे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“विविध देशांतील रेसिड्यू फ्री गुणप्रत निकष व पूर्तता,यशस्वी तरुण निर्यातदार शेतकऱ्यांची यशोगाथा
कृषीमाल निर्यात-मनातील शंकांची उत्तरे,एकात्मिक कीड व्यवस्थापन,बँकिंग फायनान्स व सरकारच्या योजना समजावून सांगितल्या जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सोबत जोडलेल्या गुगल फॉर्म वर रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन”-सतीश देशमुख,अध्यक्ष,’फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ पुणे.
भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा व्यावसायिक सेवा निर्यात करणारा देश मानला जातो.सेवांमधील जागतिक व्यापारात भारताचा ४.६% वाटा आहे.भारताच्या सेवा निर्यातीत २७ % वाढ झाली आहे.सप्टेंबरमध्ये,भारतातील प्रमुख सेवा उद्योगाने या क्षेत्रातील वाढीव मागणीमुळे वाढीव गती अनुभवली.नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असेही सूचित करण्यात आले आहे की व्यवसायांनी नऊ वर्षांपेक्षा अधिक काळातील उच्च पातळीचा आशावाद प्रदर्शित केला असला तरी याची फळे अद्याप ग्रामीण भागात पोहचलेली दिसत नाही.परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांत निर्याती बाबत मोठ्या प्रमाणावर जागृती करणे गरजेचे आहे हे ओळखून पुण्यातील सतीश देशमुख अध्यक्ष असलेल्या ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे.त्यांनी त्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक निर्यात सल्लागार,कृषी आयुक्तालयाचे रासज्यस्तरीय तांत्रिक निर्यात सल्लागार गोविंद हांडे,”रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडेरेशन’ (रोमीफ इंडिया)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रशांत नाईकवाडी,सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी,नाशिक चे कार्यकारी संचालक अझहर तंबुवाला,शेतीपूरक अग्रीटेक आणि सर्विसेसचे संस्थापक संचालक संजय शिरोडकर,राष्ट्रीय केळी निर्यात फोरम सदस्य (अपेडा)चे केळी निर्यातदार किरण डोके,मसाले निर्यातदार वंदना पवार आदींना उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रीत केले आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सतीश देशमुख बोलताना म्हणाले की,”ग्रामीण भागात बरेच उच्च शिक्षित बेरोजगार हुशार तरुण आहेत,’आयटी’ चे स्मार्ट लोक आहेत ते पण शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना,निर्याती संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन करून,मदत करून एक्स्पोर्ट अर्थात निर्यातीचा व्यवसाय चालू करु शकतात.
दरम्यान या परिषदेत निर्यातदार होण्यासाठीच्या आवश्यक नोंदणी प्रक्रिया,आवश्यक परवाने,मानके आणि प्रमाणिकरण,कुठल्या शेतमालाला कुठल्या देशात मागणी आहे.संभाव्य खरीददार पीक निहाय डाटा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान विविध देशांतील रेसिड्यू फ्री गुणप्रत निकष व पूर्तता,यशस्वी तरुण निर्यातदार शेतकऱ्यांची यशोगाथा
कृषीमाल निर्यात-मनातील शंकांची उत्तरे,एकात्मिक कीड व्यवस्थापन,बँकिंग फायनान्स व सरकारच्या योजना समजावून सांगितल्या जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सोबत जोडलेल्या गुगल फॉर्म वर रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन अध्यक्ष देशमुख यांनी केले असून पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण नंतर जाहीर केले जाणार आहे.त्यासाठी हा फॉर्म तपशील खाली दिला असल्याचे सांगितले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeYcFcQD7X1Mt49BegsDxE027-Mjj9T6AZ-6PV94coxqXPRWA/viewform
त्यासाठी संयोजक समिती नेमली असून त्यात मयूर बागुल,डॉ.दिपक गायकवाड,नंदाताई जाधव,बाळासाहेब चव्हाण,राहुल माने,बाबूलाल उदावंत,उज्वलाताई शिंदे,विश्वास सूर्यवंशी,दिलीप कापरे,सुनील कंद आदींचा समावेश असल्याची माहिती ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ या संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी शेवटी दिली आहे.