जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ॲड.कडू यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील साईनगर उपनगरातील रहिवासी व छ.संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात वकिली करत असलेले प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.शिवराज कडू यांचे पिताश्री अड्.बाळासाहेब भाऊसाहेब कडू (वय-६०) यांचे आज मध्यरात्री ०१ वाजता हृदयरोगाने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ॲड.मनोज कडू यांचे ते वडील होते.

स्व.बाळासाहेब कडू हे गत ४० वर्षापासून कोपरगाव येथे वकीली व्यवसायात होते.अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणात त्यांनी विधिज्ञ म्हणून काम पाहिले होते.कोपरगाव शहरातील व अ.नगर जिल्ह्यातील नामवंत विधीज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.अनेक वर्ष ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते.त्यांनी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्षपद भूषवले होते.

दरम्यान त्यांनी कोपरगाव शहरातील अनेक राजकीय पदे त्यांनी भूषवली होती.त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव वकील संघासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close