गुन्हे विषयक
पत्रकाराची मोठी घरफोडी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील शंकरनगर परिसरातील रहिवासी असलेले पत्रकार सिद्धार्थ सखाहारी मेहरखांब (वय-४४)यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यानी तोडून त्या कपाटातील विविध चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ६० हजारांची रक्कम असा सुमारे ०१ लाख ८० हजारांचा अवैज लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मेहेरखांब हे दि.०५ जुलै रोजी काही कामानिमित्त गावास गेले असता त्यांनी आपल्या घरास कुलूप लावले होते.व ते दि.०६ जुलै रोजी सकाळी ०८ वाजता परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळले होते.त्यांनी आपल्या घरात प्रवेश केला असता त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ६० हजारांची रोख रक्कम त्यात ५०० रुपये दराच्या नोटा,६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण,या शिवाय ६० हजार किमतीच्या सोन्याच्या दोन तोळे वजनाच्या दोन अंगठ्या असा एकूण ०१ लाख ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.मात्र कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या एक घटनेची आणखी भर पडली आहे.यातील फिर्यादी सिद्धार्थ मेहरखांब हे मूळ सुरेगाव येथील रहिवासी असून ते काही महिन्यांपूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी कोपरगाव शहरातील शंकरनगर येथे राहण्यास आले आहे.
फिर्यादी मेहेरखांब हे दि.०५ जुलै रोजी काही कामानिमित्त ते आपल्या सुरेगाव येथे गावास गेले असता त्यांनी आपल्या घरास कुलूप लावले होते.व ते दि.०६ जुलै रोजी सकाळी ०८ वाजता परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळले होते.त्यांनी आपल्या घरात प्रवेश केला असता त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ६० हजारांची रोख रक्कम त्यात ५०० रुपये दराच्या नोटा,६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण,या शिवाय ६० हजार किमतीच्या सोन्याच्या दोन तोळे वजनाच्या दोन अंगठ्या असा एकूण ०१ लाख ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी लबाडीच्या इराद्याने लंपास केला आहे.दरम्यान या प्रकरणी नगर येथील ठसे तज्ज्ञांचे पथक आले असून त्यांनी काही पुरावे गोळा केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी सिद्धार्थ मेहेरखांब यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक ढिकले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१६/२०२३ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे करत आहेत.