जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगाव तालुक्यातील…या स्कूलच्या बास्केटबॉल संघाची स्पर्धेसाठी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ,नगर जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्ष वयोगटाखालील मुलींची जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा लोणी येथे घेण्यात आली होती.या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुलींच्या विजयी संघात राजवी गवारे,हृदया बागरेचा,नेतल समदडिया,श्रेया गवारे,मुक्ता मुंजे,अन्वी उंबरकर,हर्षिता अजमेरे, ईश्वरी गोडसे,धनश्री रोहोम,दीक्षा दोशी,सिद्धी ढवळे,गिरिजा निर्मळ या खेळाडूंचा समावेश होता.खेळाडूंना समताचे बास्केटबॉल क्रीडा प्रशिक्षक रोहित महाले आणि इतर क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.

अ,नगर जिल्ह्यातील मुलींच्या १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.समताचा बास्केटबॉल संघ आणि आर्मी पब्लिक स्कूलचा संघ यांच्यात अंतिम लढत झाली त्यात समता स्कूलच्या बास्केटबॉल संघाने १०-० अशी अंतिम लढत जिंकली आहे. विजयी संघातील खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सन्मानित करून अभिनंदनाचा वर्षाव केला.

मुलींच्या विजयी संघात राजवी गवारे,हृदया बागरेचा,नेतल समदडिया,श्रेया गवारे,मुक्ता मुंजे,अन्वी उंबरकर,हर्षिता अजमेरे,ईश्वरी गोडसे,धनश्री रोहोम,दीक्षा दोशी,सिद्धी ढवळे,गिरिजा निर्मळ या खेळाडूंचा समावेश होता.खेळाडूंना समताचे बास्केटबॉल क्रीडा प्रशिक्षक रोहित महाले आणि इतर क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.

समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,कार्यकारी संचालिका स्वाती कोयटे, उप प्राचार्य समीर अत्तार,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी निवड झालेल्या संघाचे व मार्गदर्शन करणाऱ्या क्रिडा विभागाचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close