जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शिर्डीत गाडी ओलांडण्याच्या कारणाहुन तरुणाची हत्या !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गाडी ओलांडण्याच्या किरकोळ कारणाहुन शिर्डीत गुरुवार दि.१३ रोजी मध्यरात्री १२ वाजुन १० मिनीटाच्या सुमारास विठ्ठल साहेबराव मोरे,(वय ३५)वर्षे रा. भिमनगर,या तरुणांची हत्या करण्यात आल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात खुन व अँट्राँसिटी कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने शिर्डी शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शिर्डी पोलीसांनी संशयित आरोपी श्रीकांत राजु शिदे,(वय-३०) वर्षे रा.शिर्डी या तरुणास अटक केली आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.सिसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाब नुसार अधिक माहीती नुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्राकडुन समजले.

याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी माहीती देताना सांगितले की,शिर्डीत पिंपळवाडी रोडवर सय्यद बाबा दर्गा समोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठल साहेबराव मोरे रा.भिमनगर,शिर्डी हा तरुण अपेरिक्षा क्रमांक एम.एच.१७ ए.ए.६७४ ही घेउन पिंपळवाडी रोडने घराकडे जात असताना श्रीकांत शिंदे याचे कडील इन्होवा गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.के.११०० ) या रस्त्यावरुन घेऊन जात होता. रस्त्यात रिक्षा उभी असल्याने शिंदे यांची गाडी जाण्यास रस्ता नव्हता.यावेळी दोघांत गाडी ओलांडण्याच्या कारणावरून वाद झाला.यात विठ्ठल साहेबराव मोरे या तरुणाचा मृत्यु झाला. सिसीटीह्वी फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब नोंदवुन या मध्ये वादाचे काय कारण आहे आणि घटना नेमकी कशी घडली याबाबत पुढील तपास करणार आहे. मयत मोरे यांची रिक्षा व आरोपी शिंदे यांची इनोव्हा गाडी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी श्रीकांत राजु शिंदे रा. कालीकानगर यास शिर्डी पोलिसानी अटक केली आहे.न्यायालयात आरोपी शिंदे यास हजर केले असता सोमवार पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक डाँ.दिपाली काळे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचोरे, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे,स.पो.नि.मिथुन घुगे,स.पो.नि.दातीरे, रुपवते आदी पोलीस अधिका-यांनी भेट दिली. शिर्डी पोलीसात कृष्णा रमेश शेजवळ रा.शिर्डी यांनी फिर्याद दाखल केली आहे.त्यावरुन गुन्हा रजि. नं. १६०/२०२०भा.द.वि.कलम ३०२,अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१),(आर),(एस)३(२)(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे करत आहे.दरम्यान या घटनेने शिर्डी व राहाता तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close