जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने अड्.अजित काळे यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांचे पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेले कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीच्या जनहित याचिकेद्वारे मार्गी लावण्यात अहंम भूमिका निभावणारे प्रसिद्ध वकिल व शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित काळे यांचा राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने येत्या रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ नेते सोमनाथ पाटील दरंदले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या वेळी शेतकऱ्यांच्या वर्ग -२ च्या जमिनी वर्ग-१ करण्यासाठी अड्.अजित काळे हे मार्गदर्शन करणार असल्याने या प्रश्नाशी संबंधित शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास अवश्य यावे.दरम्यान या ठिकणी पिंप्री दर्शन येथील शाहीर हिरामन भानुदास थोरात व शाहीर कान्हू सुम्बे या लोक कलावंतांचा जाहीर सामना रंगणार असल्याची माहितीही सोमनाथ दरंदले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम जलसंपदा विभागाने २००८ साली पूर्ण करून त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास प्रारंभ झाला आहे.वास्तविक धरणाआधी कालव्यांचे काम करणे गरजेचे असताना त्याकडे प्रस्थापित राजकीय नेते व जलसंपदा विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.त्यामुळे आज अर्धशतक उलटत आले असतानाही या प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही.यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने २०१३ सालापासून कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे व समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी हि चळवळ आपल्या हाती घेतली व गावोगाव जनजागृती सभांचे आयोजन करून जनतेला वस्तुस्थिती दाखवून दिली.व थेट केंद्रीय जल आयोगाकडून तत्कालीन खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सहाय्याने या प्रकल्पासाठी आवश्यक सतरा पैकी चौदा मान्यता २०१४ याखेर मिळवल्या होत्या.त्या नंतर उर्वरित मान्यता भाजप सरकार देत नाही हे लक्षात आल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सप्टेंबर २०१६ मध्ये समितीचे शेतकरी विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी जनहित याचिका दाखल करून तीन मान्यता मिळवल्या आहेत.निधी बाबतही राज्य व केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्रावर लेखी आश्वासन दिले आहे.या शिवाय लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी पळविणाऱ्या अनेक हितशत्रूंचा बंदोबस्त न्यायिक मार्गाने केला आहे.अद्यापही हि लढाई सुरु असून सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचली आहे.तथापि या लढाईत सर्वाधिक सहयोग देणारे वकील म्हणून अड्.अजित काळे यांचे काम या प्रकल्पासाठी अविस्मरणीय ठरले आहे.अकोले तालुक्यातील जाणीवपूर्वक रखडून ठेवलेले काम कालवा कृती समितीने न्यायालयाच्या आदेशाने मागील जुलै महिन्यात पोलीस बंदोबस्तात सुरु केले आहे.निधी किती व तो कुठून-कुठून देणार,प्रकल्प कधी पूर्ण करणार या बाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे.त्यामुळे हे काम आता वेगाने सुरु झाले आहे.यात कालव्यांच्या कामावर जाऊन फोटो काढून गैरसमज पसरविणाऱ्यांचा दुरान्वयाने संबध नाही हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यामुळे अड्.अजित काळे यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सत्कार हा अल्पमती प्रयत्न आहे. त्यामुळे या सत्कार समारंभास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोमनाथ दरंदले,नानासाहेब गाढवे,अशोक गांडूळे,संतोष गायकवाड,कारभारी वैद्य,माधव बनसोडे,पावलस कोळगे,दादाभाऊ बनसोडे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,नवनाथ शिरोळे,दगुभाई सय्यद,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,शब्बीर सय्यद आदींनी केले आहे.या बाबत नुकतीच कोऱ्हाळे येथे साईबाबा मंदिरात नियोजन बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close