जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लक्ष्मीनगरातील अतिक्रमणे नियामानुकूल करा-आ. काळेंची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील शासकीय जागेवर वर्षानुवर्षापासून राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमाकुल करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नावचे उतारे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा अशा सूचना कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी समितीला दिल्या असल्याचे वृत्त आहे.

ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. त्या नागरिकांच्या जागा शासन नियमानुसार नियमित कराव्या यासाठी आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक यानी सातत्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे व वेळोवेळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देखील आवाज उठविला असल्याचा दावा केला आहे.

कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर जवळपास ४६५ कुटुंब राहत आहे. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. त्या नागरिकांच्या जागा शासन नियमानुसार नियमित कराव्या यासाठी आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक यानी सातत्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे व वेळोवेळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत देखील आवाज उठविला आहे. शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांचा प्रश्नांचे गांभीर्य ओळखून आ. काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी समितीची बैठक घेतली. त्यावेळी या बैठकीत बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावे. शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांना त्त्यांच्या जागेचे उतारे लवकरात कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या. या बैठकीमध्ये कोपरगाव शहराच्या इतर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतहि महत्वाची चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागुल, जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघे, भूमिअभिलेख उपाधीक्षक पोळ, अभियंता वाघ, हर्षवर्धन सुराळकर, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाघचौरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागुल, जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघे, भूमिअभिलेख उपाधीक्षक पोळ, अभियंता वाघ, हर्षवर्धन सुराळकर, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाघचौरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close