जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शिर्डी शहरात मारहाणीत तरुणांचा मृत्यू

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहता तालुक्यातील सावळी विहीर ग्रामपंचायत हद्दीतील रिक्षाचालक दाविद सुरेश जाधव (वय ३९) यास रविवार दि. ५ जानेवारी रोजी निमगाव कोऱ्हाळे शिवारातील एका परमीट रुम बाहेर रात्रीच्या वेळी काही तरुणांनी मारहाण करून जखमी केले अशी फिर्याद ८ जानेवारी रोजी रोहन विजय गुंजे याने शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिली शिर्डी पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३०/२०२० भादवी ३२६ जबरी दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली होती. जखमी दाविद जाधव हा साईबाबा संस्थान च्या दवाखान्यात उपचार घेत असताना १२ जानेवारी रोजी मयत झाल्याने तीन जणाच्या विरोधात खून केल्याचे भा.द.वि.कलम ३०२ हे वाढीव गुन्ह्याचे कलम लावण्यात आले असल्याची माहिती प्रभारी पोलिस उपनिरीक्षक दिपक गंथाले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी त्या हाॅटेल च्या ठिकाणी जाऊन सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची पहाणी व तपास करुन या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून यात सहभागी असलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले होते यात सागर भाऊसाहेब गायकवाड, आनंद बाबा गायकवाड,आशिष नंदु लोंढे या आरोपीना अटक करुन राहाता न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १३ जानेवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असुन आणखी संशयित तरुणांना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याचे सांगितले आहे.मयताला न्याय मिळावा यासाठी मयताची पत्नी ज्योती दाविद जाधव व तिच्या नातेवाईकांनी पोलीसांकडे चौकशीची जोरदार मागणी केली आहे.यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक नितीन गोकावे यांनी जनसमुदाया समोर बोलताना सांगितले की,” या घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेतली आहे अंत्यत बारकाईने या घटनेचा तपास पोलिस करीत असुन तीन संशयित पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे.पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे असे सांगुन नातेवाईकांनी संयम दाखवुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी नातेवाईकांनी जो पर्यंत इतर संशयतीना अटक करत नाही तो पर्यंत मयताचे शवविच्छेदन करणार नाही व अंत्यसंस्कार देखील करणार नाही अशी भूमिका घेतली होती सहाय्यक पोलिस निशिक्षक मिथुन घुगे व प्रभारी पोलिस उपनिरीक्षक दिपक गंधाले यांनी नातेवाईकांनी संयम दाखवुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली होती या घटनेनंतर मोठा जमाव पोलिस ठाण्यात हजर झाला होता. अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close