जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणांची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला व शिर्डीत हॉटेल व्यवसायात नोकरी करत असलेल्या तरुण सागर शंकर माळी (वय-१९) याने अज्ञात कारणाने विष प्रश्न करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्याच्यावर आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

वडगाव येथील तरुण सागर माळी याने रात्रीच्या सुमारास औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे हि बाब सकाळी घरच्या नातेवाईंच्या लक्षात आल्यावर त्यास शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भरती केले होते.त्या दरम्यान तो कोमात गेला होता.तो अखेर पर्यंत शुद्धिवर आलाच नाही.अखेर आज पहाटे १.३० वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली आहे.मात्र आत्महत्या करण्याचे कारण निष्पन्न झाले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,तरुणांच्या व तरुणींच्या आत्महत्या अलीकडील काळात चिंताजनक पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत.जागतिक पातळीवर बघता,मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. वय वर्षे १५-४४ यात आत्महत्या हे मृत्यूच्या प्रमुख तीन कारणांमध्ये आहे.भारतातदेखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणार्‍यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत.यात नुसता प्रयत्न करणार्‍यांची संख्या कितीतरी जास्त आहे.दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे.अशीच आत्महत्या नुकतीच कोपरगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ फेब्रुवारी रोजी घडली होती.त्या तरुणांचे नाव सागर शंकर माळी असे आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्यावर आज सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

दरम्यान सकाळी हि बाब घरच्या नातेवाईंच्या लक्षात आल्यावर त्यास शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भरती केले होते.त्या दरम्यान तो कोमात गेला होता.तो अखेर पर्यंत शुद्धिवर आलाच नाही.अखेर आज पहाटे १.३० वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली आहे.मात्र आत्महत्या करण्याचे कारण निष्पन्न झाले नाही.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी नोंद केली आहे.

दरम्यान घनतस्थळी पोलीस निरीक्षक देसले व पोलीस हवालदार संदीप बोटे आदिनी भेट दिली आहे.त्याच्या पश्चात वडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असलेली आई उज्ज्वला शंकर माळी,वडील,एक भाऊ.एक बहिण असा परिवार आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१७/२०२३ सि.आर.पी.सी.१७४ अन्वये नुकतीच नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close