जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकास गजाने मारहाण,एक जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादिस त्याच गावातील आरोपी भैया राजेंद्र इंगळे याने मारुती मंदिरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास लोखंडी गजाने मारहाण केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विशाल नामदेव ईंगळे (वय-२२) यांनी गुन्हा दाखल केला आहे.

दि.११ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा मारुती मंदिरासमोर बसलेला असताना आरोपी भैया इंगळे हा घट्नास्थळी आला व त्याने प्रथम शिवीगाळ दमदाटी केली व आपल्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे डोक्यात मारून त्यास जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात पाऊस पाणी भरपूर असल्याने व शेतात कामे नसल्याने ग्रामस्थ रिकामटेकडे असल्याने भांडण तंटे यांना ऊत आला आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील लौकी गावात घडली आहे.फिर्यादी विशाल इंगळे व आरोपी भैया इंगळे हे एकाच गावातील रहिवासी व भाऊबंद आहेत.त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद आहेत.

दि.११ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा मारुती मंदिरासमोर बसलेला असताना आरोपी भैया इंगळे हा घट्नास्थळी आला व त्याने प्रथम शिवीगाळ दमदाटी केली व आपल्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे डोक्यात मारून त्यास जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस फौजदार ए.एम.आंधळे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंदणी पुस्तिका क्रं.३५७/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close