जाहिरात-9423439946
संपादकीय

  बी.अँड सी.च्या चुलीवर वकिलाच्या भाजतायेत भाकरी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   
   कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था सत्तेत कोणीही येवो दूर होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही त्यामुळे अनेकांना आपले जीव हकनाक गमवावे लागत असताना दिसत असून आर्थिक नुकसान ते वेगळेच आहे.त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थानीं नुकतेच तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव संगमनेर मार्गावर एक आंदोलन केले असून त्यात बी.अँड.सी.च्या रस्त्यावर चूल करून त्यावर अड्.योगेश खालकर यांनी भाकरी थापल्याने त्याची जोरदार चर्चा कोपरगाव तालुक्यात रंगली आहे.

  

नुकतेच शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे रुपेंद्र काले व अभिजित पोटे आदींनी गणेशनगर मार्गे वाकडी ते एम.आय.डी.सी.रस्त्याबाबत श्रीरामपूर नजीक पोलीस चौकी समोर दत्तनगर येथे ‘रास्ता रोको’आंदोलन करून उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे ते कमी की काय आता जवळके नजीक दुसरे आंदोलन अड्,योगेश खालकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.त्यामुळे त्याची चर्चा सर्वत्र झडत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविक पणे त्यांच्या तोंडी नेते आणि प्रशासन यांना देण्यासाठी शेलक्या शिव्या न आल्या तर नवल.अशीच अवस्था नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या कार्यकाळापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची होती.आता तीच अवस्था नगर-मनमाड रस्ता असो की तळेगाव मार्गे संगमनेर रस्ता असो की पढेगाव मार्गे वैजापूर रस्ता असो.त्या मुळे प्रवासी आणि प्रवासी वहांनासह अवजड वाहनचालक त्रस्त असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मात्र त्यावर उतारा शोधायला कोणालाही वेळ असल्याचे दिसत नाही.नुकत्याच झगडेफाटा ते वडगाव पान या मार्गावर जवळके पर्यंत रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे मोठं मोठे बॅनर लागले होते.मात्र रस्ता पुढे चालू आणि मागे रस्ता कधी नादुरुत होऊ ? असा प्रश्न ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत होता.

झगडे फाटा ते वडगाव पान हा चाळीस कि.मी.चा रस्ता विकास करण्यासाठी एशियन विकास बँकेने घेण्याचे ठरवले होते.मात्र त्यासाठी आवश्यक तीस टक्के निधी देण्याची तरतुद येथील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारने न केल्याने तो १८९ कोटींचा निधी परत गेला तीच बाब सावळीविहिर ते भरवस फाटा याची झाली आहे.त्यामुळे हि दुरवस्था ओढवली आहे.त्यात हकनाक अनेक बळी गेले आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे.

तीच अवस्था राहाता-वावी या रस्त्याची आहे.या रस्त्यासाठी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यानी दिल्ली येथे जाऊन नितीन गडकरी यांना विनंती करून दहा कोटी रुपयांचा निधी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मार्फत आणला होता.मात्र त्यावेळीही काम सुरु असतानाच त्याची वाट लागताना दिसत होती.त्यावेळी जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यानी व बहादरपूर येथील ग्रामस्थानीं रस्त्याचे काम निकृष्ठ असल्याचे पाहून तो थेट बंद केला होता.त्यावेळी थोडी बहुत लाज वाटून पुढील काम उपकंत्राटदाराकडून काढून घेऊन ते नाशिक येथील मूळ ठेकेदाराने केले त्या वेळी तो कसाबसा बरा झाला होता.त्यातील बराच खराब भाग पुन्हा नादुरुस्त झाला होता त्याचे परत काम सुरु आहे.मात्र त्याची वाट लागताना दिसत असल्याने जवळके येथील जागृत कार्यकर्त्यानी व ग्रामस्थानीं ते वेळीच कोपरगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे.त्याची पाहणी नुकतीच संपन्न झाली आहे.आता तो कसा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

   दरम्यान कोपरगाव-संगमनेर स्त्यावरील भाग असलेल्या जवळके ते रांजणगाव देशमुख या रस्त्यावर खड्ड्यांचा पूर आलेला आहे.हा तीन कि.मी.चा रस्ता कधी नव्हे इतका खराब झाला आहे.त्याची तुलना २०११ पूर्वीच्या पुणतांबा फाटा ते झगडे फाटा यांच्याशीच होऊ शकते.मात्र त्याकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही याकडे अधिकाऱ्यांनी व नेतृत्वाने लक्ष दिल्याचे जाणवत नाही.त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांत अच्छा-खांसा संताप आहे.या आधी हा रस्ता एशियन विकास बँकेने घेण्याचे ठरवले होते.मात्र त्यासाठी आवश्यक तीस टक्के निधी देण्याची तरतुद येथील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारने न केल्याने तो १८९ कोटींचा निधी परत गेला तीच बाब सावळीविहिर ते भरवस फाटा याची झाली आहे.नुकतेच शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे रुपेंद्र काले व अभिजित पोटे आदींनी वाकडी ते एम.आय.डी.सी.रस्त्याबाबत श्रीरामपूर नजीक पोलीस चौकी समोर दत्तनगर येथे आंदोलन करून उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्याच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेच.


   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण रस्ते व त्याची दुरवस्था याबाबत तर बोलायलाच नको.जुने देवगाव मार्गे (ओस पांढरी) रांजणगाव देशमुख ते कुंभारी या रस्त्याची हाक कोणत्याही नेत्याला ऐकायला येत नाही.सदर रस्ता २०११-१२ मध्ये पंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट झाला होता.मात्र तत्कालीन सरकारने सदर निधी नक्षलग्रस्त भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी त्या भागात वर्ग केल्याने तो रस्ता तसाच राहून गेला आहे.चार वर्षांपूर्वी सदर काम करतो म्हणून दिलेले आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.काळे यांच्या उजनी आश्वासनासारखे पाळलेले नाही.आता आगामी लोकसभा आणि विधानसभा यांचे बिगुल वाजायला लागले आहे.मग हे नेतृत्व वेगळे म्हणण्याचे वेगळे कारण उरत नाही.घोषणा आणि त्याचे बॅनरच जास्त आणि काम कमी अशी काहीशी अवस्था मागील आमदार स्नेहलता कोल्हेसारखी झाली आहे.

  

जुने देवगाव मार्गे (ओस पांढरी) रांजणगाव देशमुख ते कुंभारी या रस्त्याची हाक कोणत्याही नेत्याला ऐकायला येत नाही.सदर रस्ता २०११-१२ मध्ये पंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट झाला होता.मात्र तत्कालीन सरकारने सदर निधी नक्षलग्रस्त भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी त्या भागात वर्ग केल्याने तो रस्ता तसाच राहून गेला आहे.चार वर्षांपूर्वी सदर काम करतो म्हणून दिलेले आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.काळे यांच्या उजनी आश्वासनासारखे पाळलेले नाही.

वर्तमानात पुणतांबा फाटा ते वडगाव रस्ता या रस्त्याच्या पूर्वेस नगर-मनमाड हा तर दक्षिणेस नाशिक-पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत.मग हा मधील चाळीस कि.मी.मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्यास काय हरकत आहे.त्यासाठी एशियन विकास बँक जवळपास १८९ कोटींचा निधी देण्यासाठी पुढे आली असतांना त्याकडे काना डोळा का केला गेला हे समाजायला मार्ग नाही.आता पाच आणि दहा कोटींच्या आरत्या ओवाळायचे काम नेत्यांचे आणि त्यांच्या चेल्यांचे जोरात सुरु आहे.याच मार्गावर वर्तमानात रांजणगाव देशमुख ते जवळके याची दुरावस्था वेगळी उरत नाही.त्याचे खड्डे बुजविण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवायला तयार नाही त्याकडे आमदार आणि खासदार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.त्यावर प्रतिक्रिया न उमटली तर नवल ! अधिकारी केवळ टक्क्यांसाठी काम करत आहे.त्यामुळे संताप व्यक्त होणे स्वाभाविक म्हटलं पाहिजे.अशीच प्रतिक्रिया रांजणगाव-देशमुख,अंजनापूर,बहादरपूर,धोंडेवाडी,जवळके आणि वेस-सोयगाव आदी परिसरात उमटली आहे.त्यांनी नुकतेच या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डयात चूल मांडून अड्.योगेश खालकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक पाहून आपल्या राजकीय भाकरी जोरात भाजल्या आहेत.व संगमनेर बांधकाम विभागाचे वाभाडे काढले आहे.त्यामुळे त्याची जोरदार चर्चा झडत असून ‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुलीवर वकिलाने भाजल्या राजकीय भाकरी’ अशी जोरदार चर्चा नैऋत्येकडील दुष्काळी १३ गावात आणि तालुक्यात रंगली आहे.असो निदान त्यांनी नेत्यांच्या आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीकडे लक्ष तरी वेधले आहे.नाही तरी कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्ते आपल्या नेत्यांची चापूलसी करण्यात धन्यता मानत आहेत त्यामुळे त्यांचे आंदोलन हे नक्कीच दखलपात्र ठरते.

प्रतिक्रिया संपर्क-९४२३४३९९४६.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close