टाकळी ढोकेश्वर ( प्रतिनिधी)- लोकसभेची ही निवडणुक धनशक्ती विरूद्ध जनशक्ती अशी नसुन हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही अशी ही निवडणुक असुन आम्ही ताकाला जाऊन गाडगे लपवत नाही असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी डाँ. सुजय विखे यांना लगावला आहे.टाकळी ढोकेश्वर येथील मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
टाकळी ढोकेश्वर येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे होते.यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, लोकनेेेेते निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपसभापती दीपक पवार ,ज्ञानदेव पांंडुुुळे, सभापती प्रशांत गायकवाड ,जि.प.सदस्य माधवराव लामखडे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार ,विजय औटी ,राहुल जाधव ,राजेश भंडारी, दादासाहेब पठारे , महिला तालुकाध्यक्ष सुधामती कवाद ,माजी सभापती अरूणराव ठाणगे ,किरण तराळ ,अनिल गंधाक्ते, डाॅ सुनील खेेेेडकर ,सुरेश पठारे ,सतीश पठारे, निजामभाई शेख ,पोपट कटारिया ,महेश पाटील, शिवाजी खोडदे ,भास्कररााव शिंदे ,विश्वनाथ लोंढे ,रामदास दाते ,संपत तराळ ,संदिप कपाळे, दत्तात्रय निवडुंगे ,सद्दाम इनामदार ,योगेश शिंदे, संतोष गाढवे ,योगेश वाळुंज यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की सर्वसामान्यांना गेल्या पाच वर्षात झळा बसल्या आहेत.सीबीआय व न्यायव्यस्थेवर प्रचंड दबाव आणला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदार गोंधळात पडला असुन फार मोठा अन्याय झाला आहे. शेतकरांन वतरूणांची मोठी फसवणुक झाली आहे त्यामुळे शेतकरी विरोधी सरकार फक्त भाजपमध्ये आहे.त्यामुळे कर्जमाफी व अनुदान सारख्या फसव्या घोषणा भाजपा सरकारने केल्या आहेत. नोटबंदी झाल्यानंतर १५ लाख खात्यावर येणार आहे १५ रूपये सुध्दा खात्यावर आले नाही.सरकार खोटे बोलत असल्याने उघडे पडले आहेत.त्यामुळे भाजपा सरकार भारत देशाची कृषीप्रधान ओळख पुसण्यासाठी पुढे आले आहे. बड्या उद्योजकांसाठी हे सरकार काम करत असुन व्यापारांचे पार कंबरडे मोडलेले आहे.तुमच्या प्रश्नांची जाणीव मला असल्याने भाजपाच्या मंत्री व खासदार आमदार यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे. के.के.रेंज असो वा पारनेरचा पाणी तालुक्याच्या प्रश्नांवर इतर तालुक्याच्या प्रश्नांवर सर्वांना बरोबर काम करायचे आहे. तुम्ही गरीबांचे डोनेशन व रुग्णांच्या पैशावर बोलत असल्याची टिका सुजय विखे पाटील यांचे नाव घेता केली आहे. समोरचा उमेदवार हॅलिकाॅफ्टर वाले असल्याने जनतेने खरी जागा त्यांना दाखविल्याने ते जमीनीवर आले आहे. त्यामुळे विकासात्मक काम यापुढील काळात उभे करायचा मानस संग्राम जगताप यानी केला आहे.