नगर जिल्हा
..या गावातील म्हसोबा यात्रा अखेर रद्द !
संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील येथील जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या म्हसोबा महाराज यात्रा उत्सव बुद्धपौर्णिमेच्या दिवशी भरते सलग दोन दिवस भरणारी यात्रा उत्सव यावर्षी प्रथमच कोरूना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. नवसाला पावणाऱ्या म्हसोबा महाराजांची ख्याती असल्यामुळे यात्रे निमित्त लोहगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहात असतात परंतु प्रथमच या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यात्रेची परंपरा यंदा खंडित करण्यात आलेली आहेग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य तंटामुक्ती समितीची अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील यात्रा कमिटी या सगळ्यांनी गावातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी कुणीही या मंदिरात दर्शनाला येऊ नये व शासनाचे सहकार्य करावे जर या ठिकाणी कुणी गर्दी केली असता त्यावर पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेली आहे.