जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून टाळेबंदीचा फज्जा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात कोरोना विषाणूने दोन बळी गेले असताना प्रशासन टाळेबंदी करताना नाकी नऊ आलेले असताना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात सुमारे दीडशे-दोनशे नागरिकांना घेऊन एका माजी आमदाराने दुकाने चालू करण्यासाठी गळ घातली असून या प्रक्रियेत सुरक्षा अंतराचा मात्र फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.मात्र या बाबत प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”व्यापारी महासंघ हा राजकीय अजेंडा घेऊन पुढे जात नाही हा सर्वांसाठी काम करतो छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय चालू व्हायला हवेत या साठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे.किराणा दुकानदार कुठेही अवैध व्यवसाय करत नाही.तालुका प्रशासन येवला जवळ असल्याने टाळेबंदीचा आग्रह करते तो योग्य वाटतो अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १८३ ने वाढून ती ४६ हजार ६१७ इतकी झाली असून १५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १४ हजार ५४१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.मालेगाव,येवला ठिकाणाहून काही नागरिक गुपचूप शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद व तालुका प्रशासन मोठ्या तणावात असताना आज दुपारी बाराच्या सुमारास माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी आपले शिष्टमंडळ आपल्या गुरुद्वारा रस्त्यावरील कार्यालयात शहरातील नागरिकांना एकत्र करून त्यांना दुकाने चालू करण्याचे आश्वासित देऊन तहसील कार्यालय गाठले.मात्र या दरम्यान व तहसील कार्यालयात गेल्यावर कुठल्याही सुरक्षित अंतराचा नियम पाळला नाही त्यामुळे तालुका प्रशासनावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.या आधीच कोपरगाव शहरात सुरक्षित अंतराचा नियम काटेकोर पालन होत नसल्याची तक्रार कृष्णा चोरगे या नागरिकाने आधीच जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली असल्याने हि गंभीर घटना उघड झाल्याने तालुका तहसिलदार काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला हे मान्य करून ” हि बाब तहसील कार्यालयातील अधिकार कक्षातील असल्याने त्याबाबत कारवाईबाबत तेच निर्णय घेतील” असे उत्तर दिल्याने या बाबत तालुक्यात नागरिकांनीं एक आणि पुढाऱ्यांना एक असे दोन कायदे आहेत काय असा सवाल केला आहे.

या वेळी आ. कोल्हे यांनी कोपरगाव शहरात अनेक गरजू व्यापारी असून त्यांची दुकाने ४०-४२ दिवसांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे त्यांचे अर्थचक्र थांबले आहे.त्यांना गती देण्यासाठी हरित आणि नारंगी पट्टा असलेल्या भागात अटींशर्तींच्या अधीन राहून काही उद्योग-व्यवसायांना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे.कोपरगाव शहरात देखील व्यापाऱ्यांनी आजवर सहकार्य केले आहे मात्र त्यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून प्रशासनाने यावर नियम आणि अटींच्या अधीन राहून योग्य तो मार्ग काढत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह छोट्या व्यावसायिकांना आपले दुकाने सुरक्षित अंतर पाळत चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी हि विंनती कोपरगाव प्रशासनाला केली आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,” ते आपल्या मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी आले होते त्यांच्यावर कारवाई कशी करणार” अशी बोटचेपी भूमिका घेतली आहे.

दरम्यान या ठिकाणी आदल्या दिवशी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना भेटून आपल्या मागण्या रेटल्याचा आरोप करण्यात आला आहे.व बाकी छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय केल्याचे रान उठवून या व्यापाऱ्यांत दुही पसरवली असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.विशेषतः या ठिकाणी किराणा दुकानदार हे जास्तीच्या भावाने आपला माल विकत असून तंबाखूपुडी ८० रुपये प्रति नग तर गुटख्यातून लाखो रुपये कमावित असल्याचा आरोप केला आहे.विशेष त्याला उपस्थित नागरिकांनी दुजोरा दिला आहे.

“व्यापाऱ्यांची मागणी योग्य आहे मात्र जवळ येवला असल्याने बाब गंभीर आहे.मात्र कायदा हा सर्वांना समान असल्याने जे चुकीचे वर्तन करीत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे प्रशासनाचे कामच आहे.अन्यथा कायदा हा छोट्यांसाठीच असल्याचा गैरसमज नागरिकांत पसरला तर कायद्याची वाट लागायला वेळ लागणार नाही-विरेन बोरावके,गटनेते कोपरगाव नगरपरिषद.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close