नगर जिल्हा
..या गावात २४ लाख ४० हजाराचा मद्यसाठा जप्त ?
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी-(किशोर पाटणी)
कोरोनामुळे संपुर्ण भारतात टाळेबंदी व नगर जिल्ह्यात या काळात दारूबंदी असतानाही दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत टाकलेल्या धाडीत आनंद बीअर शाॅपीच्या पाठीमागे असलेल्या गोदामात त्याच गावातील आरोपी योगेश नंदकुमार कडलग (वय-३५) यांचेकडे बीअर व दारूचा जवळपास २४ लाख ४० हजाराचा साठा जवळपास १५ आधिकारी १० पोलीसाच्या पथकाने जप्त केला आहे.या घटनेने राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत टाकलेल्या धाडीत आनंद बीअर शाॅपीच्या पाठीमागे असलेल्या गोदामात त्याच गावातील आरोपी योगेश नंदकुमार कडलग (वय-३५) यांचेकडे बीअर व दारूचा जवळपास २४ लाख ४० हजाराचा साठा जवळपास १५ आधिकारी १० पोलीसाच्या पथकाने जप्त केला आहे.
देशभरात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला आहे.त्यामुळे नागरिकांना वाचविण्यात सगळी शक्ती शासनाची खर्ची पडत असतांना काही अवैध व्यावसायिकांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी आपले डोके वर काढले आहे.या बाबत जिल्ह्याच्या दारू उत्पादन व शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या खबरी वरून त्यांनी त्यांनी राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे या ठिकाणी धाड टाकली असता त्यांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. कोरोनाच्या संकट काळात इतकी मोठी धाडसी कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली आहे हे विशेष !
एरवी दारूबंदी खाते म्हणजे शोभेचे बाहुलेच असते.इतका मोठा साठा पहिल्यांदाच हाती आला असून संदरची कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. या कारवाईत टुबर्ग, किंगफिशर,बडवायझर अशा १७ कंपन्याच्या बीअर बाटल्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. मुकेश सुरेश मुजमुले यांच्या फिर्यादीवरून मुंबई दारुबंदी कायदा १९४९चे कलम ६५(अ)(ई)८०(१)८३ नुसार आरोपी योगेश नंदकुमार कडलग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.या कारवाईत कोपरगाव विभागाचे दारुबंदी निरीक्षक बी. टी. गोरताळे,अजित बढदे,संजय सराफ, अनिल पाटील, धवल गोवेकर,पी बी आहेरराव,कैलास क्षेत्रे, यांच्यासह पोलीस कर्मचारी निहाल उके, भाऊसाहेब भोर, निहाल शेख, राजेंद्र कदम, विकास कंठाळे, प्रविण साळवे, पांडुरंग गदादे आदींनी भाग घेतला आहे.या प्रकरणी अधिक तपास दारुबंदी उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अजित बढदे हे पुढील तपास करीत आहेत