जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील त्या महिलेचा अंत्यविधी..येथे होणार !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या लक्ष्मीनगर येथील कोरोनाग्रस्त साठ वर्षीय महिलेचे आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान निधन झाले असून हा कोपरगाव तालुक्यातील पहिला कोरोना बळी ठरला आहे.दहा एप्रिल नंतर चार दिवस कोरोना विषाणूशी झुंज दिल्यानंतर या महिलेने आज नगर येथील ग्रामीण रुग्णालायत शेवटचा श्वास घेतला.या महिलेचा अंत्यविधी हा नगर येथील अमरधाम येथेच संपन्न होणार असून या अंत्यविधीसाठी जवळच्या नातेवाईकांना कोणालाही उपस्थित राहाता येणार नसल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

आज मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे ५.३० वाजता या महिलेने आपला चार दिवसाचा कोरोनाशी केलेला संघर्ष आज संपवला असून त्याची अधिकृत घोषणा आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.या बाबत आमच्या प्रातिनिधीने या बाबत कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या महिलेच्या उत्तर क्रियेबाबत विचारणा केली असता त्यांनी,”या माहिलेचाच अंत्यविधी नगर येथेच संपन्न होणार असून या अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही हजर राहाता येणार नसल्याचे सांगितले आहे.

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी पुण्याहून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे होते त्यांनी त्या रात्रीच लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर व धारणगाव रस्त्यानजीकचा परिसर सील केला होता. या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास अठरा जण रात्रीच ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती.त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती.त्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून यातील अठरा जणांचे अहवाल दोन टप्प्यात नकारात्मक आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.त्यातील एका रुग्णास आत्मा मलिक हॉस्पिटल येथे देखभालीत ठेवले होते तर चौदा जणांना हॉटेल स्पॅन येथे देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे.दरम्यान आज मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे ५.३० वाजता या महिलेने आपला चार दिवसाचा कोरोनाशी केलेला संघर्ष आज संपवला असून त्याची अधिकृत घोषणा आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रातिनिधीने या बाबत कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या महिलेच्या उत्तर क्रियेबाबत विचारणा केली असता त्यांनी,”या माहिलेचाच अंत्यविधी नगर येथेच संपन्न होणार असून या अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही हजर राहाता येणार नसल्याचे सांगितले आहे.त्या मुले कोरोना साथीचे गांभीर्य अजून वाढला असून नागरिकांनी घराबाहेर पडणे किती महागात पडू शकते याचे हे पहिलेच उदाहरण उत्तर नगर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.नगर जिल्ह्यात या महिलेच्या मृत्यूने हा दुसरा बळी ठरला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close