जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याची कोठडीत रवानगी,जामीन निर्णय उद्या

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगावचे तहसील तहसीलदार विजय जबाजी बोरुडे व त्यांना लाच घेण्यात मदत करणारा आरोपी गुरमितसिंग दडियाल या दोन आरोपीना वाळूचोरीतील वाहनावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना नुकतीच त्यांना रात्री अटक करण्यात आली होती त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना कोपरगाव येथील न्यायमूर्ती रजेवर असल्याने आज नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.जी.बी.जाधव यांचे समोर आज दुपारी ३.३० वाजता हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्यांचा जामीनावरील निर्णय उद्या पर्यंत राखून ठेवला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपींना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यावर कारवाई व जाबजबाबासाठी शिर्डी येथील सरकारी विश्राम गृहात नेले असता त्या ठिकाणी सदर आरोपींना सोडविण्यासाठी जिल्हा सेनेचा एक माजी प्रमुख,कोपरगाव येथील महसुलचे अनेक अधिकारी व कर्मचारी हे लाखों रुपयांच्या थैल्या घेऊन हजर होते.तर महसुलच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट,’घालीन लोटांगण वंदीन चरण’ अशी भूमिका घेतली होती.मात्र लाचलुचपतचे अधिकारी त्यांना बधले नाही हे विशेष !

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी (वय-३३) यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे याने आपल्या गुरमितसिंग दडीयाल या हस्तकांमार्फत २० हजार रुपयांची लाच मागितली होती. (सदर हस्तक हा जुन्या शिवसेनेच्या एका माजी शहर पदाधिकाऱ्याचा भाऊ आहे) त्यावर नाराज होऊन फिर्यादीने हा सापळा लावला होता.त्यातून कोपरगावचा तहसीलदार विजय बोरुडे (वय-४४) हा आपल्या हस्तकांमार्फत सुमारे २० हजारांचा हप्ता पंचासमक्ष घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप्पधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाकडून पडकले गेले आहे.त्यांना सहकार्य करणारा इसम गुरमीतसिंग दडियाल (वय ४०) रा.कोपरगाव यास हि दि.१९ मे रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या कोपऱ्यावर असलेल्या हॉटेल मध्ये काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले होते.

त्यावेळी प्रवीण लोखंडे यांना पोलीस हवालदार पंकज पळशीकर,पो.नाईक नितीन कराड,प्रवीण महाजन,प्रभाकर गवळी,चालक पो.ना.संतोष गांगुर्डे आदींनी सहकार्य केले होते.आरोपींना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत आज संपली होती.मात्र कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय हजर नसल्याने व श्रीरामपूर येथील तीच स्थिती असल्याने त्या आरोपीना थेट नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.जी.बी.जाधव यांचे समोर आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हजर केले होते.त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी तहसीलदार विजय बोरुडे व दडियाल यांची पोलीस कोठडीतून न्यायिक कोठडीत रवानगी केली आहे.मात्र त्या अंतर दोन्ही आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र तो जिल्हा सत्र न्यायालयाने आज राखून ठेवला असल्याची माहिती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान त्या अर्जावर उद्या म्हणजेच मंगळवार दि.२३ मे रोजी दुपारी त्याची सुनावणी होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपींना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यावर कारवाई व जाबजबाबासाठी शिर्डी येथील सरकारी विश्राम गृहात नेले असता त्या ठिकाणी सदर आरोपींना सोडविण्यासाठी जिल्हा सेनेचा एक माजी प्रमुख,कोपरगाव येथील महसुलचे अनेक अधिकारी व कर्मचारी हे लाखों रुपयांच्या थैल्या घेऊन हजर होते.व त्यांनी,”आमच्या साहेबांस सोडवा” असे आर्जव केले होते.तर महसुलच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट,’घालीन लोटांगण वंदीन चरण’ अशी भूमिका घेतली होती.मात्र अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने व त्यांनी त्यांची,’एक ना सुनी’ त्यामुळे त्यांना रिकामे हात हलवत परतावे लागले आहे.त्यामुळे नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या या अधिकाऱ्यांचे व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close