जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

२५ लाख रु.साठी महिलेचा छळ,कोपरगावात ५ जणांविरुद्ध गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी कारखाना येथील कॉलनीत हल्ली रहिवासी असलेली व गुजरात येथील सासर असलेल्या महिलेला तिचा नवरा परेश यशवंत ढोणे,सासरा,सासू,दीर,सर्व रा.अमरेली गुजरात नणंद हेतल देवकाते रा.बडोदा आदींनी माहेराहून घर बांधणीसाठी २५ लाख रुपये आणावे यासाठी वारंवार शारीरिक,मानसिक छळ करून उपाशी पोटी ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फिर्यादी महिला श्रद्धा परेश ढोणे (वय-३३) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे.

हुंडा देणे व घेणे ही परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ठ प्रथा आहे.हुंडयापायी छळ होवून अनेक युवतींना वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे लागत आहे व समाजात अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगावे लागत आहे.या पध्दतीमुळे कुटूंबाची दुर्दशा होणे,मुले मातेच्या प्रेमापासून पारखी होणे व वैवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या युवतींचा प्रश्नही निर्माण होतो.या सर्व समस्यांवर वचक बसावा म्हणून सरकारने हुंडा बंदी कायदा तयार केला आहे.तरीही असे गुन्हे वारंवार दाखल होताना दिसत आहे.

दरम्यान अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कॉलनीत हल्ली रहिवासी असलेल्या व सासर गुजरात येथील असलेल्या श्रद्धा ढोणे या महिलेच्या बाबतीत घडली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण माहेर संजीवनी साखर कारखाना कॉलनी येथील असून माहेर अमरेली गुजरात येथील आहे.सदर महिलेचे तिच्या आई-वडिलांनी लग्न दि.१४ मे २०२२ रोजी मोठ्या डामडौलात करून दिले होते.सुरुवातीचे नव्यानवलाईचे नऊ दिवस गेल्यावर सासरच्या मंडळींनी आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला होता.सदर विवाहित महिलेला तिचा नवरा परेश यशवंत ढोणे,सासरा यशवंत मारुती ढोणे,सासू चंपाताई यशवंत ढोणे,दीर जिटेश यशवंत ढोणे सर्व रा.अमरेली गुजरात नणंद हेतल अमित देवकाते रा.बडोदा आदींनी माहेराहून घर बांधणीसाठी २५ लाख रुपये आणावे यासाठी वारंवार शारीरिक,मानसिक छळ करून उपाशी पोटी ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान तिने अखेर वैतागून तिने आपल्या माहेरी धाव घेऊन सादर गंभीर बाब आपल्या नातेवाईकांच्या लक्षात आणून दिली होती.त्यातून आज हा गुन्हा आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाधित महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.दरम्यान सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी या प्रकरणी गुन्हा नोंद क्रं.१९२/२०२३ भा.द.वि.कलम ४९८(अ)३२३,५०४,५०६ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close