कोपरगाव तालुका
वाहनाच्या धडकेत एक ठार,कोपरगावात अकस्मात मृत्युची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी असलेले रिक्षाचालक बाळासाहेब पंढरींनाथ बारसे (वय-४७) यांचे आज पहाटे नगर-मनमाड मार्गावर येसगाव येथील बस स्थानकावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.यांच्या पश्चात भाऊ,पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत इसम हे रोज सकाळी बस स्थानकावर आपली रिक्षा उभी करून नगर-मनमाड मार्गाने चालण्याचा व्यायाम करत असत व प्रवासी मिळाल्यावर ते कोपरगाव,शिर्डी आदी ठिकाणीही आपल्या प्रवाशांना पोहच करण्याची सेवा करत असत.आज सकाळी ०५ वाजेच्या सुमारास ते आपली रिक्षा घेऊन आले होते.व त्यांनी ती बस स्थानकावर उभी करून ते सकाळच्या प्रहरचा व्यायाम करत असताना त्यांना मागील बाजूने अज्ञात वाहनाने धडक दिली आहे त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
स्व.बाळासाहेब बारसे हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हूणन परिसरात परिचित होते.ते नगर-मनमाड मार्गाच्या कडेला दत्त मंदिराजवळ कुलकर्णी वस्तीजवळ राहत होते.त्यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता.रोज पहाटे ०५ वाजेच्या सुमारास ते व्यवसायाची काळजी म्हणून रोज बस स्थानकावर आपली रिक्षा उभी करून नगर-मनमाड मार्गाने चालण्याचा व्यायाम करत असत व प्रवासी मिळाल्यावर ते कोपरगाव,शिर्डी आदी ठिकाणीही आपल्या प्रवाशांना पोहच करण्याची सेवा करत असत.आज सकाळी ०५ वाजेच्या सुमारास ते आपली रिक्षा घेऊन आले होते.व त्यांनी ती बस स्थानकावर उभी करून ते सकाळच्या प्रहरचा व्यायाम करत असताना त्यांना मागील बाजूने अज्ञात वाहनाने त्यांना सकाळी ६.३० वाजे पूर्वी कधीतरी धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यात त्यांच्या डोक्याला मर लागला होता.त्यात त्यांच्या तोंडातून रक्त वहात असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शीनी दिली आहे.सदर धडक एका दुचाकीस्वाराने दिली असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे.
दरम्यान सकाळी दुसरा रिक्षा चालक संजय पवार यांच्या हि बाब लक्षात आली असता त्यांनी आपल्या मुलाच्या सहकार्याने त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली होती.घटनास्थळी सहाय्यक फौजदार आंधळे यांनी यांनी भेट दिली आहे.दरम्यान आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर येसगाव स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यावेळी ग्रामस्थानीं मोठी गर्दी केली होती.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.२६/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.