जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावातील…या विद्यालयात,’राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डॉ.सी.व्ही.रमण यांच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस,’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयामध्ये,’विज्ञान मंच’ या उपक्रमाअंतर्गत ‘कुतूहल-मला उत्तर हवंय’ या नावाने विज्ञान प्रश्न पेटी स्थापन करण्यात आली आहे.ज्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात घडणारे,ऐकलेले,वाचनात येणारे कुतूहल आदी जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतात.त्याला विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे.

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

सदर प्रसंगी साई कुलकर्णी या विद्यार्थ्याने डॉ.सी.व्ही.रमण यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.वेदांत येवले याने दैनंदीन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विषद केले.उजमा शेख हीने अंधश्रद्धा निर्मूलनावर विज्ञान कथा सादर केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी डरांगे यांच्यासह विविध शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

सदर कार्यक्रमाचे मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन विद्यार्थिनी गायत्री चंदाले व अरीबा शाह यांनी केले तर विदयालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close