जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘त्या’ हल्ल्यातील जखमीची…या नेत्याने घेतली रुग्णालयात भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील शेतकरी गंगाधर ठाकरे यांच्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.त्यांच्यावर सध्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून आ.आशुतोष काळे यांनी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान या घटनेबाबत आ.काळे यांनी वन विभागाला देखील सूचना करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या आहेत.तर त्याची वन विभाग आगामी काळात किती अमंलबजावणी करील हे लवकरच दिसणार आहे.

धामोरी येथील गावाच्या उत्तरेस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या ठाकरे वस्ती येथे बिबट्याने गायीचे वासरे,कुत्रे,आदींवर हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी गंगाधर वाळीबा ठाकरे (वय-६८) हे त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नांत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला होता.त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.त्यामुळे धामोरीसह कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते.त्यांच्यावर कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरु आहेत.त्यावेळी त्यांनी हि भेट घेतली आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनोज जगझाप, सुनील मांजरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर व जखमी ठाकरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान या घटनेबाबत आ.काळे यांनी वन विभागाला देखील सूचना करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close