जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावात शिवसेनेच्या…या विजयी उमेदवारांचा सत्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या असुन डाऊच ब्रु ग्रामपंचायतीवर उध्वव ठाकरेंच्या शिवसेनेने भगवा फडकविला आहे.माजी सरपंच संजय गुरसळ यांनी मागील पाच वर्षाच्या काळात जनतेचे विविध कामे मार्गी लावली.जनतेचा विश्वास त्यांनी जिंकला या कामाची पावती म्हणुन डाऊचच्या जनतेने त्यांना पुन्हा संधी देवुन त्यांची पत्नी स्नेहा संजय गुरसळ यांना प्रंचड मतांनी विजयी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात काळे गटास १५ तर काळे गटास ९ तर एक अपक्षास प्राप्त झाली असून यात एकमेव डाऊच खु.ग्रामपंचायत शिवसेनेस मिळाली आहे.त्यांचा नुकताच उद्धव सेनेच्या वतीने गौरव केला आहे.

कोपरगाव तालुक्यात काळे-कोल्हे परजणे यांची मोठी ताकद आहे.प्रस्थापित पक्षाच्या विरोधात लढून त्यांनी मोठा विजय मिळविला आहे.या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल शिवसेनेचे शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख (उध्दव ठाकरे)राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी उमेदवारांचे डाऊच येथे २४ डिसेंबर रोजी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला आहे.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,कलविंदरसिंग दडियाल,इरफान शेख,बाळासाहेब सांळुखे,राहुल देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close