आरोग्य
दहिगाव बोलका गटात कोरोना रुग्णांची उसळी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात घसरत असंताना दिसत आहे.सरकारने आता विविध उपाय योजना करून लसी देण्याचे प्रमाण वाढवले आहे.मात्र कोपरगाव तालुक्यात भोजडे,टाकळी आदी ठिकाणी कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे.
कोपरगाव तालुक्यात भोजडे हद्दीत पुन्हा ०७ तर टाकळीत ०४ असे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.तर त्या खालोखाल कोळपेवाडी,पोहेगाव,दहिगाव बोलका येथे प्रत्येकी ०२ तर त्या नंतर झगडेफाटा,सोनेवाडी,माहेगाव देशमुख,कुंभारी,कोकमठाण,रवंदे,येथे प्रत्येकी ०१ रुग्ण आढळला आहे.तर शहरात केवळ ०२ अशी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे तर शहरासह तालुक्यात २३ अशी मोठी रुग्णवाढ नोंदवली आहे.
कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ३७२ रॅपिड तपासण्या करण्यात आल्या असून त्यात १३ रुग्ण बाधित आढळले असून ३५९ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ३८० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०८ तर अँटीजन तपासणीत १३ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात वाढ होऊन २३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३४ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ८०९ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ८२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख १५ हजार ४६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख ६१ हजार ८६८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०६.८७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार ५०२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.९३ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३८ हजार ०६५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ४५० झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २८ हजार ६१६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९९८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.पुढाऱ्यांचे वाढदिवस,यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असून मंदिरे काही प्रमाणात खुले केली असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत सरकारने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान आता शाळा,कॉलेज सुरु झाले असून आता चित्रपट व नाट्यगृहास पूर्ण क्षमता गृहीत धरून परवानगी देण्यास तयार झाले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात लक्षणीयरीत्या रुग्णवाढ झाली आहे.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यामुळे प्रशासनाने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होणार आहे.